RV126B08704
रावेर : ॲथलेटिक्स स्पर्धेतील यशस्वी संघासोबत प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. यू. पाटील, डॉ. एच. डी. धापसे, क्रीडा संचालक डॉ. उमेश पाटील आदी.
-----------
नाईक महाविद्यालयाची
ॲथलेटिक्स स्पर्धेत बाजी
सकाळ वृत्तसेवा
रावेर, ता. २२ : येथील रावेर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री. व्ही. एस. नाईक महाविद्यालयाने आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावत महाविद्यालयाने जनरल चॅम्पियनशीपही आपल्या नावे केली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत आयोजित आंतर महाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत महाविद्यालयाच्या कृष्णा राठोड, यश पगारे, वेदांत जाधव, भावेश चौधरी व रवींद्र बारेला यांनी उल्लेखनीय योगदान दिले. महिला गटात जान्हवी रोजुदे, तेजस्विनी ढाके, राधा नाईक, ममता सूर्यवंशी, हर्षा पवार व मानसी पाटील यांच्यासह अन्य खेळाडूंनीही चमकदार कामगिरी करीत महाविद्यालयाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमंत नाईक, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. यू. पाटील, उपप्राचार्य डॉ. एच. डी. धापसे, ‘आयक्यूएसी’ सदस्य विजय महाजन, डॉ. पी. व्ही. दलाल, नॅक समन्वयक डॉ. बी. जी. मुख्यदल, क्रीडा संचालक डॉ. उमेश पाटील, क्रीडा समिती सदस्य प्रा. चतुर गाडे व प्रा. लालचंद वळवी व प्राध्यापकांनी कौतुक केले. यशस्वी खेळाडूंना क्रीडा संचालक डॉ. उमेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.