online exam sakal
नाशिक

Sahakar Bharti 2023 : सहकार पदभरतीसाठी 14, 16 ला परीक्षा; या संकेतस्थळावरून करा प्रवेशपत्र डाउनलोड

सकाळ वृत्तसेवा

Sahakar Bharti 2023 : सहकार विभागातील गट ‘क’ संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदभरतीसाठी ६ जुलैच्या जाहिरातीस अनुसरून विहित मुदतीत प्राप्त झालेल्या उमेदवारांची टीसीएस कंपनीमार्फत १४ व १६ ऑगस्टला ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी दिली. (sahakar bharti online exam on 14 16 august nashik news)

परीक्षेच्या प्रवेश पत्राबाबतच्या सूचना उमेदवारांना त्यांनी अर्ज सादर करतेवेळी नोंदणी केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर व ई-मेल यावर पाठविण्यात आल्या आहेत.

प्रवेशपत्र डाउनलोड करावयाची लिंक आणि सूचना सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वरील संकेतस्थळावरून उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे आणि परीक्षेस येताना प्रवेशपत्राची रंगीत प्रत सोबत ठेवावी.

त्याचप्रमाणे प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT