Women drivers present for training. Neighbor A. K. Pawar esakal
नाशिक

SAKAL Exclusive : ST बसची स्टिअरिंग मार्च महिन्यापासून महिलांच्या हाती!

जलील शेख

मालेगाव (जि. नाशिक) : मुंबई बेस्टमध्ये महिला चालक नियुक्तीपाठोपाठ राज्यातील एसटी बसमध्ये मार्चपासून महिला चालक बस चालविताना दिसणार आहेत. राज्यातील ३१ विभागांत २०६ महिला चालकांना ८० दिवसांचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे.

हे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे. मार्चअखेर महिला चालकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल. यानंतर अवजड वाहन समजले जाणारे आणखी एक क्षेत्र महिला काबीज करतील. महिलांसाठी हा क्षण प्रेरणादायी ठरणार आहे. (SAKAL Exclusive Steering of MSRTC bus in hands of women from March nashik news)

लालपरीची स्टिअरिंग मार्चपासून महिलांच्या हाती येणार आहे. राज्यातील ३१ विभागांत महिला चालकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. २०१९ मध्ये प्रस्तावित असलेल्या या मोहिमेचा तब्बल तीन वर्षांनंतर श्रीगणेशा होणार आहे. एसटी बसच्या ३१ विभागांत ३२ हजार ७०० चालक, तर २६ हजार ८०० वाहक आहेत.

यात चार हजार ५०० महिला वाहक आहे. एसटी बसमध्ये अद्यापपर्यंत महिला चालक नव्हत्या. या महिला चालक व वाहक या दोन्ही पदासाठी काम करतील. २०१९ मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पुणे येथे महिला चालक नियुक्तीच्या मोहिमेचा प्रारंभ झाला होता.

त्यानंतर एसटी महामंडळातर्फे महिला चालकांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली. २०२० मध्ये कोरोना संसर्गामुळे झालेला लॉकडाउननंतर महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनामुळे ही मोहीम लांबणीवर पडली. आता त्यास मुहूर्त सापडला आहे.

राज्यातील ३१ एसटीच्या विभागांत महिला चालक व वाहकांचे ८० दिवसांचे प्रशिक्षण सुरू आहे. लवकरच या महिला प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एसटी बसच्या स्टिअरिंगचा ताबा घेत प्रवासी बस असलेल्या रथाचे सारथ्य करतील.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

या विभागात सुरू आहे प्रशिक्षण

राज्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा या ३१ विभागांत २०६ महिला चालकांचे एक वर्ष अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षण अंतिम टप्प्यात आहे.

असे सुरू आहे प्रशिक्षण

महिला चालकांना रोज दहा किलोमीटरवर बस चालविणाचे प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये घाट, रात्रीच्या वेळेस येणारे अडथळे, गर्दीच्या ठिकाणी, राष्ट्रीय महामार्गावर या ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षण ८० दिवस सुरू असून, यामध्ये महिलांना प्रजापिता ब्रह्मकुमारीतर्फे मानसिकतेत वाढ व नाशिक परिवहन विभागातर्फे अपघातात विशेष काळजी या संदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. प्रशिक्षणाबरोबरच महिला चालकांना वर्कशॉपबद्दल माहिती दिली जाते.

सुरवातीला बस चालविताना भीती वाटायची; सध्या भीती वाटत नाही. महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. मार्च महिन्यात प्रशिक्षण संपल्यावर एसटी बस चालविताना अभिमान वाटेल. इतर महिलांना प्रेरणा देणारा हा उपक्रम आहे. -माधवी साळवे, प्रशिक्षणार्थी चालक, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

भारतीय संघ 'घरच्या' मैदानावर पाहुणा म्हणून खेळणार! बाहेरचा संघ यजमान म्हणून मिरवणार; नेमकं असं का होणार? जाणून घ्या वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : आज रात्री आम्हाला अटक केली जाऊ शकते; CJP संस्थापक अभिजीत दीपके यांचा दावा

Car Stunt Video: धावत्या कारच्या छतावर बसून जीवघेणा स्टंट! Video Viral होताच पोलिसांची कारवाई, तरुणाने कान पकडून मागितली माफी

CM Joseph Vijay Movie : कायदेशीर लढाई आणि सेन्सॉरच्या आक्षेपानंतर अखेर 'जननायकन' रिलीज! थलपती विजय यांच्या शेवटच्या चित्रपटाची धमाकेदार एन्ट्री, 50 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती

SCROLL FOR NEXT