The businessmen gave a statement to Assistant Inspector Chetan Lokhande at Vavi Police Station and informed about their decision. esakal
नाशिक

Nashik News : श्रीराम मूर्ती स्थापनेनिमित्त मांस विक्री बंद! वावी येथील मुस्लिम खाटीक समाजाचा पुढाकार

अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी न्यासच्या वतीने साकारण्यात आलेल्या मंदिरात येत्या सोमवारी दि. 22 श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

अजित देसाई

वावी : अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमी न्यासच्या वतीने साकारण्यात आलेल्या मंदिरात येत्या सोमवारी दि. 22 श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

या दिवसाचा उत्सव साजरा करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील वावी येथील मुस्लिम खाटीक समाज बांधवांनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी गावातील मांस विक्रीची सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्वांसाठी अविस्मरणीय असणार आहे. या दिवशी देशातील मंदिरांमध्ये पूजापाठ केला जाणार असून गावांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

दिवाळी, गुढीपाडव्याप्रमाणे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्सव म्हणून साजरा करण्याचे नियोजन अनेक गावांमध्ये करण्यात आले आहे. सिन्नर तालुक्यातील वावी येथील मुस्लिम समाज बांधवांनी देखील या सोहळ्यात सक्रिय योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

वावी गावात मांस विक्री करणारे व्यावसायिक मुस्लिम खाटीक समाजाचे आहेत. या सर्व व्यावसायिकांनी एकत्र येत हिंदू बांधवांना मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर आपली मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

या दिवशी गावात कुठेही व कोणीही मांस विक्री करणार नाही असे या व्यवसायिकांनी सर्वानुमते ठरवले. या संदर्भात व्यावसायिकांनी वावी पोलीस ठाण्यात सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे यांना निवेदन देऊन आपल्या निर्णयाची माहिती दिली.

सिन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष ईलाहीबक्ष शेख, विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश वेलजाळी, किरण संधान, मांस विक्रेते सलमान शेख , सलमान मुलानी, अबरार शेख, वसीम काझी, दानिश शेख यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk Video : सोनम वांगचुक यांनी उपोषण का सोडले, सरकारशी काय चर्चा झाली? व्हिडिओ शेअर करत सगळंच सांगितलं

भारतीय संघ 'घरच्या' मैदानावर पाहुणा म्हणून खेळणार! बाहेरचा संघ यजमान म्हणून मिरवणार; नेमकं असं का होणार? जाणून घ्या वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : आज रात्री आम्हाला अटक केली जाऊ शकते; CJP संस्थापक अभिजीत दीपके यांचा दावा

Car Stunt Video: धावत्या कारच्या छतावर बसून जीवघेणा स्टंट! Video Viral होताच पोलिसांची कारवाई, तरुणाने कान पकडून मागितली माफी

CM Joseph Vijay Movie : कायदेशीर लढाई आणि सेन्सॉरच्या आक्षेपानंतर अखेर 'जननायकन' रिलीज! थलपती विजय यांच्या शेवटच्या चित्रपटाची धमाकेदार एन्ट्री, 50 वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती

SCROLL FOR NEXT