Sambhaji Raje Chhatrapati speaking at the guidance meeting.  esakal
नाशिक

Sambhajiraje Chhatrapati : महाराष्ट्रात अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण : संभाजीराजे छत्रपती

सकाळ वृत्तसेवा

Sambhaji Raje Chhatrapati : महाराष्ट्रात अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण चालू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हा बदल एक माणूससुद्धा करू शकतो. त्यासाठी एक-एकाने ठरविले पाहिजे स्वराज्यासाठी काय करायचे आहे. त्यासाठी स्वराज्याची भूमिका मांडली पाहिजे.

स्वराज्याच्या मागे उभे राहिले पाहिजे, असे प्रतिपादन स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी केले. स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. (Sambhajiraje Chhatrapati statement about Politics in Maharashtra nashik news)

यश लॉन्स येथे झालेल्या मेळाव्याप्रसंगी स्वराज्य संपर्कप्रमुख करण गायकर, उपाध्यक्ष अप्पासाहेब कुडेकर, उत्तम महाराष्ट्रप्रमुख केशव गोसावी, सचिव शिवाजी मोरे, सदस्य विजय वाहुळे, नवनाथ शिंदे, पुष्पा जगताप, महिला आघाडीप्रमुख मनोरमा पाटील आदी उपस्थित होते. संभाजीराजे छत्रपती म्हणाले, महाराष्ट्राला संतांचा, महापुरुषांचा इतिहास आहे, परंपरा आहे.

त्यांनी दिलेल्या दिशेने आपण चाललो आहोत का, याचा विचार करावा. लेखन व वाचनात आपण कमी पडत आहोत. महापुरुष नावासाठी राहिले आहे. त्यांच्या विचारांच्या दिशेने आपण जात नाही. शिक्षणावर खूप कमी खर्च केला जात आहे. सर्व गोष्टींचे खासगीकरण चालले आहे. नाशिक हे मुंबईपासून जवळ आहे. शेतमालाच्या हमीभावाच्या बाबतीत धोरण नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाशिकमध्ये सर्वाधिक किल्ले आहेत. त्यांच्यासाठी राजकीय नेत्यांनी काय केले. स्वराज्याची भूमिका, वेगळेपण, राजकारण, उद्दिष्टे हे शेवटच्या घटकापर्यंत पोचले पाहिजे. स्वराज्याचे कार्यकर्ते हे कॉपी करणारे नको.

प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. करण गायकर यांनी स्वराज्य पक्षाचे पद घेतल्यानंतर जो काम करणार नाही त्यांची जबाबदारी काढून घेतली जाईल. प्रत्येक पदाधिकाऱ्याने शिस्तीने आणि प्रामाणिकपणे काम केले पाहिजे, असे सांगितले. कल्याणी पेखळे व अर्चना गोडसे यांनी मनोगत व्यक्त केले. उमेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. केशव गोसावी यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT