पान ३ मुख्य
VNI26B13238
सप्तशृंगगड ः रोप वे इमारतीतील सभागृहात नवरात्रोत्सवादरम्यान प्रशासनाच्या विविध विभागांच्या कामगिरीचा आढावा व आवश्यक सूचना करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार नितीन पवार, साहाय्यक जिल्हाधिकारी काश्मिरा संखे आदी
-----------------
नवरात्रोत्सव निर्विघ्नपणे पार पाडावा
-------------
जिल्हाधिकारी प्रसाद ः गडावरील अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
------------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.१५ : सप्तशृंगगडावरील शारदीय नवरात्रोत्सवात भाविकांची सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था आणि सुरळीत यात्रा व्यवस्थापनाला प्राधान्य देत संपूर्ण उत्सव निर्विघ्न पार पाडावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी (ता.१५) प्रशासनाला दिले. गडावरील अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी छापे टाकून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी सूचनाही त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला केली.
---------
नवरात्रोत्सवाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी दुपारी तीनला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, यावेळी उत्सवाच्या आतापर्यंतच्या कालावधीतील अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि आगामी दिवसातील यात्रा व्यवस्थापनाबाबत चर्चा करण्यात आली. भाविकांना सुरक्षित व सुलभ दर्शन मिळावे तसेच विविध विभागांमध्ये समन्वय राहावा, यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
१६-१
मद्यविक्री, ड्रोन शूटिंगवर लक्ष
सप्तशृंगगडावर मद्यविक्री बंद ठेवण्याच्या सूचनांचा प्रभावीपणे अंमल करावा. अवैध मद्यविक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गड परिसरात ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यासाठी पोलिस आणि वनविभागाची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे. विनापरवानगी ड्रोन शूटिंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले.
१६-१
महिलांसाठी स्वतंत्र मार्ग
गर्दीच्या काळात महिला भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मार्गावर पोलिस प्रशासनाने विशेष लक्ष ठेवावे आणि महिला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
१६-१
आरोग्य सुविधांवर भर
यात्रेदरम्यान उद्भवणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीचा विचार करून रुग्णवाहिकांमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. गंभीर प्रकृतीच्या भाविकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळेल, याची दक्षता घेण्यास आरोग्य यंत्रणेला सांगण्यात आले. अन्न व औषध प्रशासनानेही आवश्यक तपासण्या आणि कारवाई करावी. त्यांच्या कामात अडथळे येऊ नयेत, यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे, नवरात्रोत्सवाच्या उर्वरित कालावधीत सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि विनाअडथळा दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बैठकीस आमदार नितीन पवार, साहाय्यक जिल्हाधिकारी काश्मीरा संखे, तहसीलदार रोहिदास वारुळे, उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मदेव शेळके, पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, साहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास ठोंबरे, सप्तशृंगगड ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, रोपवे प्रकल्प व्यवस्थापक राजीव लुंबा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
-----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.