नाशिक

सप्तमीला सप्तशृंगगडावर भाविकांचा जनसागर! सुटीचे दोन दिवस आणि सप्तमीचा दुर्मीळ योग;

CD
पान-३ साठी VNI26B13251---VNI26B13252 सप्तशृंगगड ः शारदीय नवरात्रोत्सवातील सप्तमीनिमित्त भाविकांच्या आदिमायेच्या दर्शनासाठी लागलेल्या बाऱ्या. ------- VNI26B13249 सप्तशृंगगड ः नवरात्रोत्सवानिमित्त श्री भगवती मंदिरावर करण्यात आलेली आकर्षक रोषणाई अन रात्रीच्या अंधारात गडाचे खुललेले सौंदर्य. ---- ३६-४ शुभ दिन सप्तमीचा सप्तशृंगी शांभावी! ------------ सातव्या माळेला लाखावर भाविक नतमस्तक ः सलग सुट्यांमुळे तुडुंब गर्दी ----------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता. १७ ः'' शुभ दिन सप्तमीचा सप्तशृंगी शांभावी.. उग्ररूपा नटली स्वभक्ता तोषवी.., पुष्प गंध अलंकारे जगदंबा देखणी, जयतु हे माते सप्तशृंग निवासिनी.. अशी आदिमायेची स्तुतिसुमने गात श्री सप्तशृंगी देवीच्या नवरात्रोत्सवातील सातव्या माळेला अर्थात सप्तमीस शनिवारी (ता. १७) गडावर लाखावर भाविका आदिमाये चरणी नतमस्तक झाले. शनिवार आणि रविवार या सलग सुटीच्या दिवसांसह सप्तमीची तिथी दोन दिवस आल्याने गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. शनिवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सूर्योदयापूर्वीच दर्शनाच्या बाऱ्या पहिल्या पायरीपर्यंत पोहोचल्या होत्या. दिवसभर हा ओघ कायम राहिल्याने संपूर्ण गड परिसर ‘जय माता दी’, ‘उदो गं आई उदो’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. -------------- नवरात्रोत्सवातील सप्तमीला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. शक्तीची उपासना, देवीचे नामस्मरण आणि विविध धार्मिक विधींच्या माध्यमातून भाविक या दिवशी देवीचरणी नतमस्तक होतात. सप्तमीनिमित्त गडावर धार्मिक विधींसह विविध ठिकाणी चक्रपूजेचे आयोजन केले जाते. तसेच देवीमाहात्म्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या श्री सप्तशतीच्या पारायणात महिला भाविक सहभागी होतात. सकाळी ट्रस्टच्या कार्यालयात आदिमायेच्या सुवर्ण अलंकाराचे विधिवत पुजनानंतर डफाच्या निनादात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. देवीची पंचामृत महापूजा देणगीदार भाविक किसन बल्लाळ आणि उमेश जामसंडेकर यांच्या हस्ते करण्यात आली. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात देवीचा अभिषेक व विधिवत पूजाविधी पार पडला. नाशिक विभागाच्या साहाय्यक धर्मादाय आयुक्त अनामिका मोताळे-पोरे यांनी संकल्प आरती केली. विश्वस्त संस्थेतर्फे विशेष बाब म्हणून साक्री तालुक्यातील वालवे येथील भाविक मंगलदास गायकवाड यांनाही महापूजेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली. पुरोहित घनश्याम दीक्षित, शेखर देशमुख, मिलिंद दीक्षित, गौरव देशमुख, भाग्येश दीक्षित, प्रसाद दीक्षित, ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख, सुनिल कासार आदी उपस्थित होते. १६-१ सप्तमी दोन दिवसांमुळे गर्दी सप्तमीची तिथी दोन दिवसांच्या कालावधीत आल्याने आगामी काळातही दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाविकांना शिस्तबद्ध आणि सुरळीत दर्शन मिळावे, यासाठी मंदिर विश्वस्त संस्था, महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी रांगेतील शिस्त पाळावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन विश्वस्त संस्थेतर्फे करण्यात आले आहे. ----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT