नाशिक

भक्तीचा अढळ वारसा सांडव्यावरची देवी

CD
फोटो - विकी कदम यांच्याकडून घ्यावा भक्तीचा अढळ वारसा -------------------- सांडव्यावरची देवी वणीच्या सप्तशृंगी देवीचे दुसरे रूप मानल्या जाणाऱ्या पंचवटीतील सांडव्यावरच्या देवीला सुमारे अडीचशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांच्या भक्तीतून साकारलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सवात विविध धार्मिक विधी होतात. दसऱ्याला देवीला सोने अर्पण करण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुलभ दर्शनाचे नियोजन राजेबहाद्दर कुटुंबीयांकडून केले जाते. - दत्ता जाधव पंचवटी नाशिक येथे गोदावरी नदीच्या काठावर श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. मंदिरात घटस्थापनेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दसऱ्याला भगवतीला सोने अर्पण करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही देवीभक्तांच्या संभाव्य गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर विश्‍वस्त असलेल्या सरदार राजेबहाद्दर कुटुंबियांकडून भाविकांच्या सुलभ दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. देवी मंदिराच्या मागील बाजूस नदी ओलांडण्यासाठी पूर्वी सांडवा होता. यामुळे या देवीला सांडव्यावरची देवी या नावाने स्थानिक लोक ओळखतात. पेशव्यांचे सरदार नारोशंकर शंकरराव राजेबहादूर (दाणी) यांनी सुमारे २५० वर्षांपूर्वी बांधले. देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ समजल्या जाणाऱ्या वणीच्या श्री सप्तशृंगी देवीचेच हे दुसरे रूप आहे. मंदिर स्थापनेमागील प्रचलित आख्यायिका सरदार नारोशंकर हे श्री सप्तशृंगी देवीचे निस्सीम भक्त होते. नाशिकमध्ये अथवा बाहेर मोहिमेवर असतानाही ते देवीची नियमित उपासना करीत असत. नाशिक येथे वास्तव्यास असताना ते दर पौर्णिमेला घोड्यावरून देवीच्या दर्शनाकरिता जात असत. पुढे वयोमानानुसार त्यांना गडावर जाणे कठीण होऊ लागले. आपल्याला देवीचे असे नियमित दर्शन घेता येणार नाही याची त्यांना खंत वाटू लागली. असेच एकदा ते देवीच्या दर्शनाकरिता गडावर गेले असताना त्यांनी देवीला, ‘मला तुझे कायम दर्शन करता यावे,’ अशी प्रार्थना केली. देवीने त्यांची भक्ती बघून त्यांना दृष्टांत दिला की, ‘मी तुझ्या मागोमाग तुझ्या घरी येऊन तुला दर्शन देईन, फक्त माझी एक अट आहे की तू मागे वळून बघायचे नाही.’ सरदार नारोशंकर अतिशय आनंदित झाले व देवीच्या आज्ञेनुसार नाशिकला यायला निघाले. पंचवटी येथे ते पोहोचल्यानंतर त्यांना शंका आली की खरंच देवी आपल्या मागे येत असेल का म्हणून त्यांनी मागे वळून बघितले तर मागे साक्षात श्री सप्तशृंगी देवी उभी होती. तेथे देवीने त्यांना सांगितले की, ‘तू मागे वळून पाहिलेस त्यामुळे आता मी इथेच थांबते.’ असे म्हणून देवी तेथेच गुप्त झाली. म्हणून सरदार नारोशंकर यांनी गोदावरी नदीच्या काठी त्याच ठिकाणी श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर बांधले. भाविकांच्या मनाला प्रसन्न करणारी अठरा भुजाधारी देवी नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते, पंचमीला देवीसमोर गोंधळाचा कार्यक्रम होतो, अष्टमीला नवचंडीचा होम केला जातो व नवमीला होमाची पूर्णाहुती देऊन नवरात्र संपन्न होते. सरदार नारोशंकर यांचे वंशज राजेबहादूर कुटुंबिय मंदिराचे व्यवस्थापन बघतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : एकटा बास! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ३ मंत्री, २ खासदार, १० आमदारांना पुरून उरले सतेज पाटील; वाचा विजयी उमेदवारांची फायनल यादी

Parenting style: पालकांनो सावधान! तुमच्या 'या' एका चुकीमुळे मूल जाऊ शकतं नैराश्यात; १५ वर्षांच्या अभ्यासातून खुलासा...

Latest Marathi News Live Update : बहुजन नेते कर्मवीर सुनील खांबे यांचे निधन

Sawai Gandharva Bhimsen Festival : यंदाचा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ १३ ते १७ जानेवारीमध्ये; प्रथमच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन

Gokul Election Satej Patil : गोकुळच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; सतेज पाटील यांची तातडीने धाव अभिजित तायशेटे आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

SCROLL FOR NEXT