पान ३
-------
VNI26B13259
सप्तशृंगगड ः आदिमायेची रविवारी सप्तमीनिमित्त बांधलेली आकर्षक पूजा.
-------------------
VNI26B13258
सप्तशृंगगड ः रविवारी पहिल्या पायरीपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी लागलेल्या बाऱ्या.
--------------
भक्तिरसात न्हाऊन निघाला सप्तशृंगगड
------------
सप्तमीनिमित्त पाऊण लाखांवर भाविकांची हजेरी ः अष्टमीला आज पालखी, नगरप्रदक्षिणा
-----------
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. १८ : ‘सप्तशृंगी माता की जय’, ‘अष्टभुजा वाली की जय’ चा जयघोष आणि डफताशांच्या गजराने आदिशक्ती सप्तशृंगीदेवीचा गड परिसर रविवारी भक्तिरसात न्हाऊन निघाला. शारदीय नवरात्रोत्सवातील सप्तमीच्या पर्वावर गुजरातसह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस सप्तमीचा धार्मिक योग आल्याने गडावर भाविकांचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला. रविवारी सुमारे ६० ते ७० हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज आहे. उद्या (ता. १९) दुर्गाष्टमीच्या पार्श्वभूमीवर गडावर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री गडाच्या शिखरावर पारंपरिक पद्धतीने कीर्तिध्वजारोहण होणार असल्याने भाविकांमध्ये उत्सुकता आहे.
-------------
सप्तशृंगीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवात सप्तमीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या पर्वानिमित्त गुजरातसह राज्यभरातून भाविकांनी गडावर हजेरी लावली. अनेक भाविक पदयात्रेने देवीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. मंदिरापासून थेट पहिल्या पायरीपर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. दिवसभर दर्शनबारी भाविकांनी गजबजलेली होती. सकाळी सातला न्यासाच्या कार्यालयात देवीच्या अलंकारांचे विधिवत पूजन करून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. शेकडो महिलांनी सप्तशतीचे पारायण केले. होमहवन, सप्तशती पारायण आणि चक्रपूजेसह विविध धार्मिक विधी झाले. खानदेशातील भाविकांनी गडावर ठिकठिकाणी चक्रपूजेचे आयोजन केले होते.
१६-१
रोपच्या तिकिटासाठी रांगा
भाविकांच्या वाढत्या ओघामुळे फनिक्युलर रोपवे परिसरातही मोठी गर्दी झाली होती. कमी वेळेत दर्शन घेण्यासाठी रोपवेचा पर्याय निवडणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने तिकीट खिडकी आणि प्रतीक्षा कक्षाबाहेर रांगा लागल्या होत्या. वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी न्यास आणि प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत होती. सलग दोन दिवसांच्या गर्दीमुळे गडावरील दर्शनव्यवस्थेवर ताण जाणवत होता. कळवणच्या उपविभागीय अधिकारी काश्मिरा संखे, उल्हासनगर येथील भाविक सागर ठाकरे यांना ट्रस्टने रविवारी देवीच्या पंचामृत महापूजेत सहभागी होण्याचा मान दिला. माजी खासदार राजन विचारे यांनी देवीची संकल्प आरती केली. माजी जिल्हाधिकारी डॉ. राधाकृष्णन बी. यांनीही गडावर येऊन देवीचे दर्शन घेतले.
१६-१
आज गडावर किर्तीध्वाजारोहण
सोमवारी (ता.१९) दुर्गाष्टमी हा नवरात्रोत्सवातील महत्त्वाचा दिवस आहे. दुपारी दोनला श्री भगवती पालखीचे पूजन होऊन नगरप्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. त्यानंतर साडेतीनला न्यासाच्या कार्यालयात कीर्तिध्वजाचे पूजन होईल. पूजेनंतर ११ मीटर लांबीचा केशरी ध्वज, दहा फूट लांबीची काठी आणि २० ते २५ किलो वजनाचे पूजासाहित्य ध्वजाचे मानकरी असलेल्या दरेगावच्या गवळी पाटील कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात येईल. पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी पाचला श्री भगवती मंदिरासमोरील यज्ञमंडपात पुरोहितांच्या मंत्रघोषात शतचंडी याग, होमहवन आणि पूजाविधी होणार आहेत. रात्री बाराला सुमारे चार हजार ५६९ फूट उंचीवर असलेल्या सप्तशृंगगडाच्या शिखरावर दरेगावचे गवळी पाटील यांच्या हस्ते कीर्तिध्वजारोहण होईल.
----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.