पान एक
-------------
13214
सप्तशृंग गड : नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेस आदिमायेचे तेजोमय रूप.
कुष्मांडा मातेच्या आराधनेने सप्तशृंगगड भक्तिरसात न्हाऊन निघाला
भगवतीला गुलाबी महावस्त्राचा साज, सामान्य भाविकालाही लाभला पंचामृत महापूजेचा मान
वणी, ता. १४ : आदिशक्तीच्या जयघोषाने दुमदुमणाऱ्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर शारदीय नवरात्रोत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात सुरू आहे. बुधवारी (ता. १४) रोजी नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेनिमित्त श्री भगवतीची नित्योपचार पूजा श्रद्धा आणि भक्तिभावाने झाली. धूप-दीपाचा सुगंध, मंदिरातील घंटानाद आणि ''उदो गं आई उदो''च्या जयघोषाने अवघा गड भक्तिरसात न्हाऊन निघाला.
सकाळी सातला ट्रस्ट कार्यालयातून आदिमायेच्या सुवर्ण अलंकारांची डफाच्या निनादात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चौथ्या माळेनिमित्त श्री भगवतीला आकर्षक गुलाबी रंगाचे महावस्त्र परिधान करण्यात आले होते. देवीला सोन्याचे मंगळसूत्र, कोयरीहार, गुलाबहार, पुतळ्यांचे गाठले, बोरमाळ, कर्णफुले व नथ, तसेच चांदीची पाऊले, मुकुट आणि कमरपट्टा आदी मौल्यवान आभूषणांनी अलंकृत करण्यात आले होते.
या वेळी ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, शाम पवार, पोपट ठाकरे, संदीप बेनके, राजेश गवळी, शांताराम गवळी, मंदिर प्रमुख सुनील कासार, विजय भवरे यांच्यासह भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----
सामान्य भाविकाला पंचामृत महापूजेचा मान
या दिवशी झालेली श्रींची पंचामृत महापूजा देणगीदार भाविक मौलिक दीक्षित आणि सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी सपत्नीक केली. विशेष म्हणजे, छत्रपती संभाजीनगर येथील सामान्य भाविक गोरख श्रीखंडे यांनाही सपत्नीक पंचामृत महापूजेच्या वेळी उपस्थित राहण्याची संधी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.