नाशिक

ऑक्टोबर हिटवर मात करीत सप्तशृंगीच्या दरबारात भाविकांची मांदियाळी!

CD
पान-१ VNI26B13198 सप्तशृंगगड ः आदिमाया सप्तशृंगीचे नवरात्रोत्सवातील तिसऱ्या माळेचे तेजोमय रुप. ----------------- गडावर तिसऱ्या माळेला गर्दीचा उच्चांक -------------- उन्हाला न जुमानता दुपारनंतर वाढला भाविकांचा ओघ ----------- सकाळ वृत्तसेवा वणी, ता.१३ : ऑक्टोबरच्या उन्हाचा चटका सहन करीत आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर मंगळवारी (ता. १३) नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेला सुमारे २५ ते ३० हजार भाविकांनी दर्शन घेतले. मंगळवार हा देवीच्या उपासनेचा वार असल्याने दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला. -------------- ‘सप्तशृंगी माता की जय’, ‘आई राजा उदो उदो’ अशा जयघोषांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनीही देवीचे दर्शन घेतले. तिसऱ्या माळेनिमित्त श्री भगवती सप्तशृंगी देवीची पंचामृत महापूजा धर्मादाय उपआयुक्त प्रणिता श्रीनिवार यांच्या हस्ते झाली. नाशिक धर्मादाय कार्यालयाचे अधीक्षक विशाल जाधव यांच्यासह ट्रस्टचे कर्मचारी, ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते. तिसऱ्या माळेला सकाळच्या सत्रात तुलनेने कमी गर्दी होती. मात्र, दुपारनंतर भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे दर्शनासाठी दाखल झाल्याने मंदिराकडे जाणारा पायरी मार्ग भाविकांनी गजबजला. देवीचे तेजोमय आणि मनमोहक स्वरूप पाहण्याची उत्सुकता भाविकांमध्ये दिसून आली. मंदिरात दर्शनानंतर अनेक भाविकांनी मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीला साकडे घातले. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गेच्या चंद्रघंटा स्वरूपाची पूजा केली जाते. हे स्वरूप शौर्य, धैर्य आणि निर्भयतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे धार्मिक वातावरणात देवीच्या दर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. १६-१ भाविकांसाठी सुविधा गडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिराच्या पायरी मार्गावरील पहिल्या पायरीजवळ नारळ फोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पायरी मार्गावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि पथके तैनात असून, फिरते आरोग्य पथकही कार्यरत आहे. ------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय; युवराज सिंगकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

यवतमाळमध्ये एसटी बस अन् दुचाकीचा भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांसह तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT