नाशिक

काॅंग्रेसतर्फे गावागावात मतदार शाेध काॅंग्रेसतर्फे गावागावात मतदार शाेध

CD
NSK26H33445 : हिंमत सिंह (फोटोचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करा) मतदार यादीतून वगळलेल्यांचा घेणार शाेध हिंमत सिंह : काॅंग्रेसतर्फे गावागावांत ‘मत वाचवा-देश वाचवा’ अभियान सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२४ : देशात माेठ्या प्रमाणात मत चाेरी झाली आहे. त्याविरुद्ध देशव्यापी आंदोलन सुरू आहे. ‘मत वाचवा-देश वाचवा’ या अभियानांतर्गंत काॅंग्रेसतर्फे आता प्रत्येक गावात जाऊन मतदार यादीतून वगळलेल्या मतदारांचा शाेध घेऊन त्यांची नावे पुन्हा मतदार यादीत टाकण्याबाबत अभियान राबविण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी १ नाेव्हेंबरला दिल्ली येथे रामलिला मैदानावर देशव्यापी आंदाेलन करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय काॅंग्रेस कमिटीचे खानदश समन्वयक हिमंतसिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. काॅंग्रेसतर्फे ‘मत वाचवा देश वाचवा अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. याच अंतर्गत जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय काॅंग्रेस कमेटीचे खानदेश समन्वयक हिमंत सिंह जळगावात आले होते. त्यांनी आज काँग्रेस भवन येथे काॅंग्रेस पदािधकारी व कार्यर्कर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, महानगराध्यक्ष जमील शेख, माजी आमदार शिरीष चाैधरी, माजी अध्यक्ष संदीप पाटील, राजीव पाटील, उदय पाटील, श्रीधर चाैधरी, मुक्ती हारूण, राहुल संत, श्‍याम तायडे आदी उपस्थित हाेते. हिमंत सिंह यांनी सांगितले की, काॅंग्रेसतर्फे प्रत्येक गावात जावून बीएलओ एक व बीएलओ-दाेन च्या पातळीवर मतदार यादीतून नावे वगळलेल्या मतदारांचा शाेध घेऊन त्यांची नावे मतदार यादीत टाकण्यासाठी अर्ज भरून घेतले जाणार आहेत. २५ नाेव्हेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. चौकट दिल्ली येथे आंदाेलन दिल्ली येथे १ नाेव्हेंबरला रामलीला मैदानावर इंडिया आघाडीतर्फे केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जाेरदार आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी देशभरातून इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच २५ नाेव्हेंबरलाही काॅंग्रेस पक्षातर्फे दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे.

''पाकिस्तान आमचं संरक्षण करतोय, भारताकडून आता अपेक्षा नाही'', माजी मुख्यमंत्र्याच्या विधानानं खळबळ

Gold Jewellery Price: लग्नासाठी सोनं आत्ताच खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी? सोन्याचा भाव 1 लाखांपर्यंत येणार?

ड्रायव्हिंग लायसन्स काढणं होणार कठीण! ऑनलाइन परीक्षेत आता ७५% गुणांची अट, केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्याच्या कोरंभी बायपासवर भीषण अपघात; वाहतूक पोलिसाचा मृत्यू

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT