नाशिक

स्कुल बसचालकाने युवकाला केली बेदम मारहाण

CD
स्कूल बसचालकाकडून युवकाला बेदम मारहाण सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २४ : भरधाव बस चालवणाऱ्या एका शाळेच्या बसचालकाला ‘गाडी जरा हळू चालव’ असे सांगणे एका खाजगी नोकरदाराला चांगलेच महागात पडले असून, संतापलेल्या बसचालकाने या तरुणावर लोखंडी टामीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. गोरख नागू आहिरे (२६, रा. पिंगळे गल्ली, मखमलाबाद) यांच्या फिर्यादीनुसार, १३ ऑक्टोबरला ते सकाळी सातच्या सुमारास ते मोपेडने (एमएच १५ एलसी ८२२१) गोदरेज कंपनीत कामासाठी निघाले होते. ते मखमलाबाद येथील इरिगेशन कॉलनीतील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ आले असता, समोरून एक शालेय बसचालक अत्यंत भरधाव आणि अविचाराने चालवत होता. त्यावरून फिर्यादी आहिरे यांनी त्या बसचालकाला गाडी थोडी हळू चालवण्याची विनंती केली. याचा राग आल्याने बसचालकाने आपली बस रस्त्यातच थांबवली. तो खाली उतरला आणि त्याने अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तू मला सांगणारा कोण? असे म्हणत त्याने आपल्या जवळील लोखंडी टामी काढून आहिरेच्या डोक्यात, तोंडावर, डोळ्याजवळ आणि पाठीवर बेदम मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात गर्दी जमू लागल्याचे पाहून संशयित बसचालकाने काढता पाय घेत पसार झाला. हल्ल्यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने आहिरे यांना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. म्हसरूळ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Ankita Bhandari Killed : अंकिता भंडारी हत्ये प्रकरणी माजी आमदार आणि अभिनेत्री नार्को टेस्टसाठी तयार, कथित VIP viral video चे गूढ उकलणार

स्मशानभूमीजवळ PM मोदींचा फोटो, भोवती सुई टोचलेलं लिंबू, नारळ अन् कुंकू; व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT