पान-३
पोर्टलमधील शाळा बदलीचाही ‘अर्थ’पूर्ण डाव
सीईओंकडून दखल ः विस्तार अधिकारी निलंबित, शिक्षणाधिकारी रजेवर
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१८ : पवित्र पोर्टलच्या आधारे मिळालेली शाळा बदलून देण्याच्या नावाखाली आर्थिक मागणी करणारे नांदगावचे शिक्षण विस्तार अधिकारी योगेश थोरात यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी घेतला.
जिल्हा परिषदेत ९९९ जागांसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात ६८० शिक्षकांची नियुक्ती समुपदेशनाने केल्यानंतर काही शिक्षकांनी शाळा बदलून मिळण्यासाठी प्रयत्न केले. एकाही शिक्षकास शाळा बदलून मिळणार नाही, असा पवित्रा सीईओ पवार यांनी घेतल्यानंतर शिक्षकांनी ‘शाळा’ करत विविध मार्गांनी प्रयत्न केले. मिळालेली शाळा गैरसोयीची वाटत असल्याने त्यांनी नियुक्ती बदलून मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. याच संधीचा फायदा घेत शिक्षण विस्तार अधिकारी थोरात यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी आपले संबंध असल्याचे सांगत सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळवून देण्यासाठी आर्थिक मागणी केली. या प्रकरणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दखल घेत विस्तार अधिकारी थोरात यांना निलंबित केले. तर शिक्षणाधिकारी सामलेटी यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.
….
१६-१
सरोज जगतापांकडे कार्यभार
सुमारे ४२ शिक्षकांच्या ‘शाळा’ बदलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केवळ संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनापुरती कारवाई मर्यादित न ठेवता संपूर्ण बदली प्रक्रियेची चौकशी होण्याची मागणी झाली. त्यावर सर्वच बदल्यांची चौकशी केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जात आहे. सामलेटी रजेवर गेल्याने त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी सरोज जगताप यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
...
माध्यमिकचा पदभार बोडकेकडे
सरोज जगताप यांच्याकडे यापूर्वी माध्यमिक शिक्षणाधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. हा कार्यभार माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी आर. आर. बोडके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. बोडके हे प्रशांत दिग्रसकर रुजू होईपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत माध्यमिक शिक्षण विभागाचा कार्यभार बघतील.
------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.