nashik crowd esakal
नाशिक

नाशिक जिल्‍ह्यात दुपारनंतर बाहेर फिरण्यास मनाई; जमावबंदी आदेश लागू

विनोद बेदरकर

कोरोना संर्सगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात १५ जून पर्यंत दुपारी ३ ते पहाटे ६ पर्यत कलम १४४ अंतर्गत जमावबंदी आदेश लागू केला आहे

नाशिक : गेल्‍या दीड महिन्‍यापासून जिल्‍ह्यात निर्बंध लागू असल्‍याने अत्‍यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्‍तू सेवा मर्यादित वेळेसाठी उपलब्‍ध होत होत्‍या. दरम्यान रेड झोनमधून नाशिक बाहेर आल्‍याने मंगळवार (ता. १)पासून निर्बंध शिथिल करत सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी दिली. मात्र, नागरिकांनी बाजारात तुडुंब गर्दी झाल्‍याने कोरोना संसर्ग बळवण्याचा धोका वाढला. जिल्ह्यात पॉझिटिव्‍हिटी रेट घटल्‍याने निर्बंध शिथिल केल्यावर, दोन दिवसात नागरिकांनी रस्त्यांवर मोठी गर्दी केली त्‍यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

लागणार पुरावा अन् ओळखपत्र

आता लॉकडाउनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर दोन दिवसांपासून रस्त्यावर वाढलेल्या गर्दीला नियंत्रणासाठी प्रशासनाने शहर व जिल्ह्यात कोरोना संर्सगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात १५ जून पर्यंत दुपारी ३ ते पहाटे ६ पर्यत कलम १४४ अंतर्गत जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे दुपारी तीननंतर सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

आवश्यक कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी ओळखपत्र व सबळ पुरावे सोबत ठेवावे लागणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी १५ जून सकाळी ०७.०० वाजेपर्यंत नाशिक जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत. प्रतिबंधात्मक उपायोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात १५ जून पर्यंत नागरिकांना दुपारी ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मनाई असेल. अत्यावश्यक कारणासाठी व्यक्तींनी बाहेर पडतांना फोटो ओळखपत्र तसेच बाहेर पडण्याचे कारण स्पष्ठ करण्यासाठी सबळ पुरावादर्शक कागदपत्रे जवळ बाळगावी लागणार आहे. सार्वजनिक, खाजगी बस वाहतूक, रिक्षा, चारचाकी व दुचाकी वाहने नागरिकांना परवानगी दिलेल्या कामासाठी वापरता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीतील आंदोलनासह दिवसभरातील सर्व घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT