नाशिक

धुळे शब्दभूषण स्पर्धा

CD
फोटो क्रमांक ः 32428 धुळे ः शब्दभूषण वक्तृत्व स्पर्धेतील जिल्हास्तरीय फेरीसाठी उपस्थित स्पर्धक. -- ‘शब्दभूषण’ स्पर्धेची २५ ला महाअंतिम फेरी --- धडक ५५ स्पर्धकांची; उत्तर महाराष्ट्रात तरुणाईसाठी हक्काचे व्यासपीठ सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ ः खानदेशातील तरुणाईसह सर्वच वयोगटांतील इच्छुकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी आणि अचूक शब्दसंधीचा आविष्कार घडविणारी शब्दभूषण वक्तृत्व स्पर्धा आता महाअंतिम टप्प्यात आली आहे. खानदेश युथ फाउंडेशनतर्फे आयोजित आणि खानदेशात सर्वांत मानाच्या ठरलेल्या या स्पर्धेची महाअंतिम फेरी येत्या २५ ऑक्टोबरला धुळ्यातील हिरे भवनात दिमाखात होणार आहे. या मानाच्या स्पर्धेसाठी यंदाही ‘सकाळ’ माध्यम समूह मीडिया पार्टनर म्हणून लाभला आहे. शब्दभूषण वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक, जिल्हास्तरीय आणि महाअंतिम (खानदेशस्तरीय), अशा तीन टप्प्यांत पार पडत आहे. धुळे महापालिकेच्या माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत पुरुष व महिला वर्गासाठी प्रत्येकी तीन गट आहेत. ते असे ः १४ ते १८ वयोगट, १८ ते २५ वयोगट, २५ व त्याहून अधिक वयोगट (खुला गट). ५५ स्पर्धकांची धडक जळगाव, नंदुरबार, मालेगाव आणि धुळे या चारही जिल्ह्यांतून तब्बल अडीचशे स्पर्धकांनी या सर्वांत मोठ्या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. जिल्हास्तरीय फेऱ्या ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांत पार पडल्या. ऑनलाइन फेरीसाठी प्रा. अनिल चव्हाण, तर ऑफलाइन फेरीसाठी पत्रकार धनंजय दीक्षित यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धकांनी सहा निर्धारित विषयांवर दर्जेदार व चुरशीची भाषणे करत उपस्थितांची मने जिंकली. या अटीतटीच्या स्पर्धेतून महाअंतिम फेरीसाठी एकूण ५५ गुणवंत स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. आकर्षक बक्षिसे महाअंतिम फेरीत तिन्ही वयोगटांतून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे एकूण नऊ विजेते ठरविण्यात येतील. विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसांचे स्वरूप असे ः प्रथम बक्षीस: १०,००० रुपये रोख, द्वितीय बक्षीस: ७,००० रुपये रोख, तृतीय बक्षीस: ५,००० रुपये रोख. स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भूसे यांच्या हस्ते होणार असून, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार मंजुळा गावित, माजी आमदार कुणाल पाटील, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस आणि ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक अभय सुपेकर उपस्थित राहतील. अवघ्या तीन वर्षांत शब्दभूषण ही स्पर्धा खानदेशातील अग्रगण्य वक्तृत्व स्पर्धा म्हणून रुजली आहे. खानदेशातील तरुणाईला व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने खानदेश युथ फाउंडेशनचे संस्थापक क्षितिज साळुंखे यांच्या मार्गदर्शनात सर्व सदस्य गेले तीन महिने या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT