''शब्दभूषण'' स्पर्धेची आज महाअंतिम फेरी
५५ स्पर्धकांची अंतिम फेरीत धडक ; तरुणांसाठी व्यासपीठ
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २४ : खानदेशातील तरुणांसह सर्वच वयोगटातील इच्छुकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी आणि अचूक शब्दसंधीचा आविष्कार घडवणारी शब्दभूषण वक्तृत्व स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे. खानदेश युथ फाउंडेशनतर्फे आयोजित आणि खानदेशात सर्वांत मानाच्या ठरलेल्या या स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवारी (ता. २५) धुळ्यातील हिरे भवनात दिमाखात होणार आहे. या मानाच्या स्पर्धेसाठी यंदाही ''सकाळ'' माध्यम समूह मीडिया पार्टनर म्हणून लाभला आहे.
शब्दभूषण वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक, जिल्हास्तरीय आणि महाअंतिम (खानदेशस्तरीय), अशा तीन टप्प्यात पार पडत आहे. धुळे महापालिकेच्या माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत पुरुष व महिला वर्गासाठी १४ ते १८ वयोगट, १८ ते २५ वयोगट, २५ व त्याहून अधिक वयोगट (खुला गट) असे प्रत्येकी तीन गट आहेत. अवघ्या तीन वर्षांत शब्दभूषण ही स्पर्धा खानदेशातील अग्रगण्य वक्तृत्व स्पर्धा म्हणून रुजली आहे. तरुणाईला व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने खानदेश युथ फाउंडेशनचे संस्थापक क्षितिज साळुंखे यांच्या मार्गदर्शनात सर्व सदस्य यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.
--------
५५ स्पर्धकांची धडक
जळगाव, नंदुरबार, मालेगाव आणि धुळे या चारही जिल्ह्यातून तब्बल २५० स्पर्धकांनी या सर्वांत मोठ्या वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला. जिल्हास्तरीय फेऱ्या ऑनलाइन व ऑफलाइन पार पडल्या. ऑनलाइन फेरीसाठी प्रा. अनिल चव्हाण, तर ऑफलाइन फेरीसाठी पत्रकार धनंजय दीक्षित यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्पर्धकांनी सहा निर्धारित विषयांवर दर्जेदार व चुरशीची भाषणे करत उपस्थांची मने जिंकली. या अटीतटीच्या स्पर्धेतून महाअंतिम फेरीसाठी एकूण ५५ गुणवंत स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.
-
आकर्षक बक्षिसे
महाअंतिम फेरीत तिन्ही वयोगटांतून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे एकूण नऊ विजेते ठरविण्यात येतील. विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसांचे स्वरूप असे यात प्रथम बक्षीस १०,००० रुपये रोख, द्वितीय बक्षीस ७,००० रुपये रोख, तृतीय बक्षीस ५,००० रुपये रोख. स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार असून, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार मंजुळा गावित, माजी आमदार कुणाल पाटील, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस आणि शिक्षणाधिकारी मनीष पवार उपस्थित राहतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.