Asha, Group Promoter, Participant in Shahapur to Thane Long March. esakal
नाशिक

Asha Worker Protest : आशा, गटप्रवर्तकांचा शहापूर ते ठाणे लाँग मार्च

आरोग्य विभागात कार्यरत गटप्रवर्तक, आशांचा राज्यव्यापी बेमुदत संप १२ जानेवारीपासून आहे.

सकाळ वृत्तसेवा

Asha Worker Protest : आरोग्य विभागात कार्यरत गटप्रवर्तक, आशांचा राज्यव्यापी बेमुदत संप १२ जानेवारीपासून आहे. आरोग्यमंत्री, प्रधान सचिव यांनी दिवाळी बोनस व मानधनवाढ तीन महिन्यापूर्वी जाहीर केली आहे.

त्याबाबतचे आदेश शासन प्रशासनाने काढलेला नाही. (Shahapur to Thane long march of Asha group promoters nashik news)

यासाठी सातत्याने आंदोलन राज्यभर आशा, गटप्रवर्तक करत आहेत. मात्र, अद्यापही सरकारने आंदोलनाची दखल घेतलेली नाही. शासनाने लक्ष वेधण्यासाठी ठाणे येथे मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी शुक्रवारी (ता. ९) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यातील आशा गटप्रवर्तक धडकणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक कृती समितीने बुधवारी (ता.७) शहापूरपासून लाँग मार्च काढला आहे. सकाळी कृती समितीचे राज्य अध्यक्ष राजू देसले, ज्येष्ठ नेते एम. पाटील, भगवान दवणे, सविता शेलार यांच्या उपस्थितीत मोर्चाला प्रारंभ झाला. शुक्रवारी हा मोर्चा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचणार आहे.

त्याचवेळी राज्यातील ७५ हजार आशा व ४ हजार गट प्रवर्तकदेखील तेथे दाखल होणार आहेत. या वेळी आशा, गटप्रवर्तक मोबदला वाढ घोषणा करेपर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरच ठिय्या मांडणार आहे. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ७५ हजार आशा व ४ हजार गट प्रवर्तक गुलाब पुष्प मुख्यमंत्री यांना महाराष्ट्र राज्य आशा गट प्रवर्तक कृती समिती त्यांना साकडे घालणार आहे.

नाशिक जिल्ह्यातून मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राजू देसले, सुवर्णा मेतकर, माया घोलप, अर्चना गडाख, प्रतिभा कर्डक, सुनीता गांगुर्डे, सविता हगवणे, कांचन पवार, सुनीता कुलकर्णी, समीरा शेख आदींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT