ramkund esakal
नाशिक

नाशिक : मंदिरे उघडण्यासाठी रामकुंडावर शंखनाद

केशव मते, विनोद बेदरकर

पंचवटी (नाशिक) : ‘मंदिर हम खुलवायेंगे, धर्मको न्याय दिलायेंगे’ अशी हाक देत भाजप (BJP) आध्यात्मिक आघाडीने आजच्या गोकुळाष्टमीच्या (gokulashtami) पार्श्‍वभूमीवर राज्यव्यापी शंखनाद आंदोलनाची हाक दिली. मंत्रभूमी असलेल्या नाशिकमध्येही आध्यात्मिक आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले.

‘मंदिर हम खुलवायेंगे, धर्मको न्याय दिलायेंगे’

कोरोना उद्रेकामुळे (coronavirus) गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील सर्वच प्रमुख मंदिरे बंद आहेत. त्याविरोधात रणशिंग फुंकण्यासाठी भाजप आध्यात्मिक आघाडीतर्फे आज (ता. ३०) सकाळी साडेआठ वाजता रामकुंडावर शंखनाद आंदोलन होणार असल्याची माहिती भाजप आध्यात्मिक आघाडीचे राज्याध्यक्ष तुषार भोसले (tushar bhosale) यांनी दिली होती. या वेळी नागरिकांसह साधू, संत, विविध मंदिराचे पुजारी उपस्थित राहून शंखनादाद्वारे राज्य शासनाचा निषेध केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शासनाच्या मंदिर बंदच्या धोरणावर कडाडून टीका केली. राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन उभारावे, असा सल्ला देत त्यानंतरही मंदिरे न उघडण्यास राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करा, त्याआंदोलनात आपणही सहभागी होऊ, अशी ग्वाहीही अण्णांनी काल राळेगण सिद्धी येथे बोलताना दिली. नगरच्या मंदिर बचाव समितीने त्यांची भेट घेऊन याप्रश्‍नी लक्ष घालण्याचे आवाहन केल्यावर अण्णांनी संबंधितांना मंदिरे उघडण्यासाठीच्या आंदोलनाबाबत आश्‍वस्त केले.

राज्यव्यापी आंदोलन

राज्य सरकारने एकीकडे मॉल, बार सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे, परंतु लाखो कोट्यवधी हिंदू धर्मीयांची श्रद्धास्थाने उघडण्याबाबत चालढकल चालविली आहे. याविरोधात राज्यव्यापी शंखनाद आंदोलनाची हाक दिल्याचे आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी सांगितले. आंदोलनासाठी शहरातील विविध आखाड्यांचे प्रमुख, प्रमुख मंदिरांचे विश्‍वस्त, पुजारी वर्गासह भाविकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलनाला बळकटी द्यावी, असे आवाहन भोसले यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : पुणे -मुंबई जुना महामार्गावर वंचित कडून रास्ता रोको

रवी शास्त्रींनी निवडला भारत-इंग्लंडचा All Time XI संघ; धोनी कर्णधार, तर गांगुलीला मात्र...

Anganwadi Nutrition: अंगणवाडीत नोव्हेंबरपासून मिळणार ‘व्हेज पुलाव’; कुपोषणाविरुद्ध पाऊल, पोषण आहार झाला अधिक रुचकर

Ambabai Temple Restoration : ब्रेकर आणि ग्राईंडरचा वापर! अंबाबाई मंदिराच्या संवर्धनात मोठी हेरफेर; पुरातत्त्व विभागाविरोधात हिंदुत्‍ववादी संघटनांसह सर्वपक्षीय आक्रमक

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT