Ajit Pawar 
नाशिक

Sharad Pawar: अजितदादांना CM करण्याच्या चर्चेवर शरद पवार स्पष्टचं बोलले; म्हणाले, सर्वांना विश्वासात...

अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं पहायला आवडेल, अशी इच्छा राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी नुकतीच व्यक्त केली होती.

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं पहायला आवडेल, अशी इच्छा राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी नुकतीच व्यक्त केली होती. त्यामुळं आता राज्याच्या राजकारणात या चर्चेला तोंड फुटलं आहे. दरम्यान, यावर शरद पवारांनीही भाष्य केलं आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. (Sharad Pawar spoke clearly on discussion of making Ajit Pawar as CM)

शरद पवार म्हणाले, "कोणाला काहीही आवडेल पण तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना? जर आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडं शक्ती नाही, संख्या नाही. त्यामुळं त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही"

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी नुकतंच कार्यकर्त्यांना उद्देशून एक जाहीर विधान केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं की, "आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल आपल्यालाला आता अजितदादांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळं कामाला लागा" विशेष म्हणजे अजित पवारांसमोरच त्यांनी हे विधान केलं होतं. लंकेबरोबरच राष्ट्रवादीच्या इतरही अनेक आमदारांची आणि कार्यकर्त्यांनी अशीच इच्छा असल्यानं लंकेंच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विखे पाटलांनी दिली मोठी माहिती

Car Accident : समृद्धी महामार्गावर भरधाव कारची अज्ञात वाहनाला धडक; एक ठार, दोघे गंभीर

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT