eknath shinde shivsena 
नाशिक

Nashik Shivsena Shinde Group: ‘क्लब टेंडर’वरून शिंदे सेनेत नाराजीचे फटाके

सकाळ वृत्तसेवा

Nashik Shivsena Shinde Group: शिवसेना दुभंगल्यानंतर महापालिकेच्या १२ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करताना प्रभागासाठी अपेक्षित निधी पदरात पाडून घेतला.

त्यानुसार १२ माजी नगरसेवकांना प्रभागात कामे करण्यासाठी नगरविकास विभागाने प्रत्येकी दोन कोटी प्रमाणे जवळपास २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला खरा, परंतु प्रभागांमध्ये कामे करताना क्लब टेंडर काढण्यावरून शिंदे सेनेत नाराजीचे फटाके फुटू लागले आहेत. (Shinde Sena upset over Club Tender nashik news)

माजी नगरसेवकांचे म्हणणे प्रत्येक कामाचे स्वतंत्र टेंडर काढा तर प्रशासनाचा आग्रह सर्व कामांसाठी एकच ठेकेदार नियुक्त करण्याकडे अर्थात क्लब टेंडर काढण्याकडे आहे. क्लब टेंडर काढण्यामागे पक्षातीलच काहींची फूस असल्याने नाराजीची तीव्रता अधिक आहे.

जून २०२२ मध्ये महाविकास आघाडीतील शिवसेना या प्रमुख घटक पक्षाला खिंडार पडले. तत्कालीन नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रथम १६ त्यानंतर ४० आमदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला. त्यानंतर भाजपच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. त्याची बक्षिसी म्हणून शिंदे यांच्या गटात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. शिवसेनेच्या शिंदे गटाला अधिकृत मान्यता मिळाली तरी चिन्हावरून न्यायालयीन लढाई सुरू आहे.

दुसरीकडे आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत शिंदे यांनी राज्यभरात ताकद मिळविण्यास सुरवात केली. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद पाठोपाठ नाशिककडे त्यांनी अधिक लक्ष देण्यास सुरवात केली.

ग्रामिण भागापेक्षा शहरी भागाकडे त्यांनी अधिक लक्ष देताना माजी नगरसेवकांचा मोठा गट शिंदे गटात समाविष्ट करण्यात यश मिळाले. जवळपास १२ माजी नगरसेवकांना त्यांनी शिंदे गटात प्रवेश दिला. शिंदे गटात प्रवेश देताना माजी नगरसेवकांनीदेखील विकासकामांचे आश्‍वासने पदरात पाडून घेतले.

वास्तविक मुख्यमंत्री या नात्याने सर्वांना समान न्याय मिळणे अपेक्षित असताना फक्त १२ नगरसेवकांच्या जुन्या तसेच नवीन भाग समाविष्ट होईल या अंदाजाने भाग निवडून निधी दिला. जेणेकरून आगामी महापालिका निवडणुकीत त्याचा सत्तेच्या दृष्टीने फायदा मिळविता येईल. नगरविकास विभागाकडून या बारा माजी नगरसेवकांच्या प्रभागांमधील विकासकामांसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

जवळपास २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. प्रभागातील रस्ते, पाणी, ड्रेनेज, उद्यानांमध्ये खेळणी बसविणे, सीसीटिव्ही कॅमेरे, ग्रीन जिम तयार करणे, वॉल कंपाउंड करणे, उद्यानात दिवे बसवणे अशा प्रकारचे ५७ कामे मंजूर करण्यात आली. सत्तेचा कसा लाभ घेता येतो सत्ता असल्याने नगरसेवकपदामागे माजी लागूनही कसा निधी मिळविला यावरून अन्य पक्षातील नेत्यांना वाकुल्या दाखविल्या जात असतानाच टेंडर प्रक्रियेवरून नवा वाद निर्माण झाला आहे.

निविदा प्रक्रिया राबविताना प्रत्येक कामाची स्वतंत्रपणे निविदा प्रक्रिया राबविली जाते. परंतु महापालिकेत ५७ कामांसाठी एकच ठेकेदार नियुक्त करण्यासाठी या कामांचे एकच टेंडर अर्थात सर्व कामे क्लब करून निविदा काढल्या जात आहे. यावरून नाराजी व्यक्त केली जात आहे. क्लब टेंडर केल्यास एकाच व्यक्तीला विचारणा होईल.

त्यामुळे प्रभागात कामे होणार असली तरी माजी नगरसेवकांना विचारणा होणार नाही. स्वतंत्र टेंडर काढल्यास स्थानिक माजी नगरसेवकांना विचारणा होईल. त्यामुळे क्लबऐवजी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी आहे. परंतु क्लब टेंडरचाच आग्रह प्रशासनाचा आहे. त्यामुळे धुसफूस वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada: रहिवाशांना गुडन्यूज! घरं रिकामी करण्यासाठी शिप्टींन चार्जेस देणार, आर्थिक मदतीसाठी म्हाडाचा मोठा निर्णय

EKA Mobility : इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, स्त्रीसन्मान अन् तरुणांना रोजगार; EKA Mobility चा तिहेरी विजय! वाचा सविस्तर यशोगाथा

T20 World Cup 2026: पाकिस्तानी सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये अव्वल अन् विकेट्स घेणाऱ्यांमध्ये अमेरिकन टॉपर! भारतीय कुठेत?

Money Lending Law: महाराष्ट्रातील सावकार अडचणीत येणार! कायद्यात मोठा बदल होणार; महाराष्ट्र सरकार महत्त्वाचं पाऊल उचलणार

Virar News : भाजपला धक्का! भाजप महिला मोर्चा प्रमुख ॲड. साधना धुरी यांचा बविआत प्रवेश

SCROLL FOR NEXT