नाशिक

शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने अनाथ व निराधार मुलांना २५ ऑक्टोबरला मदतनिधी कार्यक्रम

CD
शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट तर्फे रविवारी अनाथ मुलांना मदत वितरण देवळा, ता.१७ : आई-वडील नसणाऱ्या अनाथ, निराधार व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टतर्फे रविवारी (ता.२५) सायंकाळी पाचला उमराणे-डोंगरगाव रस्त्यावरील शिवाधार प्रकल्पाच्या प्रांगणात मदतनिधी वितरण होणार असल्याची माहिती संस्थापक शिवव्याख्याते प्रा.यशवंत गोसावी यांनी दिली. ते म्हणाले की, मदतीचे हे १३ वे वर्ष असून अशा १२७ मुलांचे पालकत्व या ट्रस्टने स्वीकारले आहे. आमदार गोकुळ गीते, गायक रमाकांत कापडणीस, उद्योजक अरुण पवार, कळवण शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांना शिवनिश्चल पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. अध्यक्षस्थानी उद्योजक दादासाहेब सूर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून पाटोदा (छत्रपती संभाजीनगर) चे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, खासदार निलेश लंके, भास्कर भगरे, आमदार डॉ.राहुल आहेर, नाफेडचे संचालक केदा आहेर उपस्थित राहणार आहेत. महारोजगार केंद्राचे संचालक भाऊसाहेब पगार, रामेश्वर कृषी मार्केटचे राजेंद्र देवरे, बळीराजा फाउंडेशनचे भाऊसाहेब आहिरे, देमको चेअरमन कोमल कोठावदे, प्राचार्य डॉ.हितेंद्र आहेर आदि प्रमुख मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी शाहीर स्वप्नील डुंबरे यांच्या लोकगीतांचा कार्यक्रम होणार आहे. पत्रकार परिषदेला ट्रस्टचे डॉ.डी.के.आहेर, डॉ.सुनील आहेर, भगवान आहेर, अनिल भामरे, पंकज जाधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Kishor: 'सम्राट चौधरींना गोळी मारा...' प्रशांत किशोर यांनी खरेच असे विधान केले आहे का?

Train Ticket Booking: तत्काळमध्येही तिकीट मिळत नाही? रेल्वेची ही ट्रिक वापरा, मिळू शकतं कन्फर्म तिकीट!

भारतात सोशल मीडियावर चाईल्ड मोड येणार? सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण शिफारस; ''इंटरनेट हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार..''

Latest Marathi News Live Update : शिर्डीत ATM कार्डची अदलाबदल करून तरुणीला गंडा; ३ हजार रुपये लंपास

मराठवाड्यात FDA ची धडक कारवाई! व्हेज-नॉनव्हेज मिक्स, झुरळांचा सुळसुळाट; डोमिनोज आउटलेटचा परवाना रद्द

SCROLL FOR NEXT