Aditya Thackeray 
नाशिक

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी शेअर केली बाळासाहेबांसोबतची नाशिक अधिवेशनाची एक आठवण

उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये सध्या अधिवेशन सुरु आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये सध्या अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनासाठी उद्धव ठाकरेंसह, संजय राऊत, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांच्यासह शिवसेनेचे मोठे नेते उपस्थित आहेत. विशेष म्हणजे आजच्या बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी हे अधिवेशन घेण्यात आलं आहे.

यापार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपले आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतची नाशिकमधील अधिवेशनाचीच एक आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे. (shivsena ubt nashik convention aditya thackeray shares a old memores with his grandfather balasaheb thackeray)

आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी 'नाशिक अधिवेशनाची एक आठवण' असं कॅप्शन दिलं आहे. या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, नारायण राणे आणि शिवसेनेची इतर वरिष्ठ मंडळी बसली आहेत. त्यांच्यासमोरुन लहान आदित्य ठाकरे जाताना दिसत आहेत. समोरुन जाणाऱ्या आपल्या नातवाला हात फैलावून आपल्याजवळ बोलावताना बाळासाहेब दिसत आहेत. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, आजच नाशिकमध्ये शिवसेनेचं अधिवेशन होत असताना आणि बाळासाहेबांची जयंती असल्यानं आदित्य ठाकरेंना आपल्या आजोबांची आठवण आल्यानं त्यांनी या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांच्या या पोस्टला सुमारे ४००० हून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये कांद्याने भरलेला पिकअप पलटी, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

भारतीय संघात बदल; ईशान किशनची माघार, त्याच्याजागी संघात नवा खेळाडू

SCROLL FOR NEXT