shivshahi bus got fire in chandori nashik Fire Accident esakal
नाशिक

Nashik Fire Accident: चांदोरी नजीक धावत्या शिवशाहीला भीषण आग

सागर आहेर : सकाळ वृत्तसेवा

Nashik Fire Accident: निफाड तालुक्यातील चांदोरी नजीक शिंपी टाकळी फाटा येथे नाशिक ते छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर आज (ता १०) रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास धावत्या शिवशाही बसला भीषण आग लागली.

सुदैवाने या दुर्घटनेत बस मधील ३२ प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (shivshahi bus got fire in chandori nashik Fire Accident )

नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर शिंपीटाकळी फाटा येथे ही दुर्घटना घडली, शिवशाही बस क्रमांक एम एच ०९, एफ एल ०४७७ ही बस नाशिकहून छत्रपती संभाजी नगर कडे जात असताना आज (ता १०) रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास धावत्या बसमध्ये इंजिनच्या बाजूने दूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले.

वाहकाने तत्काळ सदरची बस थांबून सतर्कतेने बस मधील ३२ प्रवासी खाली उतरून दिले, त्यानंतर काही क्षणातच बसने मोठ्या स्वरूपात पेट घेतला व या आगीत ही संपूर्ण बस भक्षस्थानी पडली, सदरच्या घटनेमुळे नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर वाहतूक ठप्प झाली.

मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकातील आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गडाख, सोमनाथ कोटमे,भाऊ कर्डिले किरण वाघ, सुरज पगारे,सचिन कांबळे, निलेश नाठे, गोकुळ टर्ले घटनास्थळी उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांनी यावेळी आग विजवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेय. दरम्यान या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT