नाशिक

कापड दुकानात चोरी

CD
NSK26H32935 धुळे ः आग्रा रोडवरील आरएस कलेक्शनमध्ये चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला चोरटा. --- कापड दुकानात धाडसी चोरी --- ५० हजारांची रोकड, स्प्रे, बेल्ट, शेरवाणी लंपास सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १८ ः शहरातील मुख्य व्यापारी पेठ असलेल्या आग्रा रोडवरील ‘आरएस कलेक्शन’ या दुकानात शनिवारी (ता. १७) रात्री धाडसी चोरी झाली. शेजारी सुरू असलेल्या बांधकामाच्या आधारे चोरट्याने दुकानाच्या पाचव्या मजल्यावरून प्रवेश केला. दुकानातील सुमारे ५० हजार रुपयांची रोकड, ब्रँडेड कंपनीचे स्प्रे, बेल्ट आणि महागडी शेरवाणी, असा ऐवज लंपास केला. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरासमोर असलेले हे दुकान मालक भालचंद तोलाणी यांनी शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे बंद केले. शेजारी सुरू असलेल्या बांधकामाचा आधार घेत चोरट्याने दुकानाच्या पाचव्या मजल्यावर प्रवेश केला. तेथील स्टोअर रूमचा दरवाजा उघडा असल्याने त्याने आत प्रवेश करून सुमारे अर्धा तास दुकानाची झाडाझडती घेतली. रविवारी (ता. १८) सकाळी मालक आणि कर्मचारी दुकानात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुकानासह परिसरातील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले असून, तोंडाला रुमाल बांधलेल्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff shooting incident : टायगरला फोन करून समजावलं होतं, पण...; बिश्नोई गँगनं घेतली हल्ल्याची जबाबदारी

CEC Gyanesh Kumar Row : देशातील संघर्ष आता आंतरराष्ट्रीय स्तरावर! लंडनमधून ध्रुव राठीचा थेट हल्लाबोल, म्हणाला...

Marathwada Graduate Election 2026: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! ४० हून अधिक आजी-माजी आमदार, खासदार मतदानापासून वंचित?

Solapur Politics : ऐन मतदानाच्या तोंडावर शरद पवारांना सर्वात मोठा धक्का; सोलापुरातील ३ आमदारांचा थेट भाजपला पाठिंबा, नेमकं काय घडलं?

Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT