धुळे : टुडे पान २ साठी.. अँकर
--
फोटो क्रमांक : 33439
धुळे : श्री बालाजी रथोत्सवात महाप्रसादाचे वाटप करताना अल्पा अग्रवाल. शेजारी रावसाहेब गिरासे, प्रतिभा चौधरी, चिरायु अग्रवाल, ललित माळी आदी.
--
श्री बालाजी रथोत्सवात महाप्रसादासाठी भाविकांची गर्दी
--
आमदार अग्रवाल यांच्यातर्फे पुरी- भाजीचे वाटप; विविध मंडळे, संस्था, संघटनांचे उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २४ : श्री बालाजी रथोत्सवानिमित्त शहरात विविध मंडळे, संस्था आणि संघटनांतर्फे महाप्रसाद, सरबत व अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले. आमदार अनुप अग्रवाल यांच्या वतीने आग्रा रोडवरील गोल पोलिस चौकीसमोर पुरी- भाजी महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानाच्या प्रदेश प्रभारी अल्पा अग्रवाल यांच्या हस्ते महाप्रसाद वाटपाचा प्रारंभ झाला. सायंकाळी सातला सुरू झालेले वाटप रात्रभर सुरू होते.
-
महाप्रसादस्थळी आकर्षक रोषणाई आणि मिनी डीजेची व्यवस्था केली होती. भक्तिमय वातावरणात तरुणाईने डीजेच्या तालावर ठेका धरल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महापौर मायादेवी परदेशी, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब गिरासे, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, डॉ. सुशील महाजन, नगरसेवक ललित माळी, प्रदीप बैरागी, कमलेश देवरे, चिरायु अग्रवाल, सागर कांबळे, विक्की परदेशी, मोहन टकले, किरण अहिरे, सागर कोडगीर, करण लोंढे, कल्पेश थोरात उपस्थित होते.
-
विविध प्रतिष्ठानांचे उपक्रम
रथोत्सवानिमित्त आग्रा रोडवरील श्री बालाजी प्रतिष्ठान आणि नगरसेवक गणेश जाधव यांच्यातर्फे साबुदाणा वडे व केळी, मनसेचे बंटी सोनवणे यांच्यातर्फे बुंदीचे लाडू, दत्त लस्सी आणि कोंडाजी विजय व्यायामशाळेतर्फे पुरी- भाजी, तर माजी महापौर जयश्री अहिरराव, गुड्डू अहिरराव आणि लालबाग मित्र मंडळातर्फे केळीचे वाटप करण्यात आले. बुलबुल ट्रॅव्हल्सतर्फे चणा उसळ, बाल गोपाल मित्र मंडळातर्फे सरबत वाटप करण्यात आले. उपक्रमांत नंदकिशोर गुप्ता, रमाकांत गुप्ता, कमलेश गुप्ता, सुनील गुप्ता, सूरज गुप्ता, गजेंद्र गुप्ता, गोलू गुप्ता, शुभम गुप्ता, सार्थक, नगरसेविका प्रतिभा शिंदे, विलास शिंदे, किशोर फुलपगारे, सागर कांबळे, गजूकाका जगदाळे, मंदार बबनकर, मुकेश प्रजापत, निखिल काटकर, अमित येलमामे, वेदांत जगदाळे, आयुष बहाळकर सहभागी झाले. शिवसेना ठाकरे पक्षाचे संदीप चौधरी यांच्यातर्फे उसाचा रस, उद्योजक अभिषेक अग्रवाल परिवारातर्फे कचोरी, जैन युथ क्लबतर्फे मसालाभात, व्यापारी गटातर्फे विरोधी पक्षनेते बंटी खोपडे व ज्येष्ठ नेते जोसेफ मलबारी यांच्या हस्ते केळी, तर सिद्धेश्वर गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे साबुदाणा खिचडीचे वाटप केले. सुवर्णकार कारागीर संघटनेच्या उपक्रमात दीपक वारकर, विनोद वारकर व पप्पू वारकर, तर शिवसेनेच्या उपक्रमावेळी अभियंता पराग अहिरे व अमोल जैन उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.