नाशिक

श्री चामुंडामाता मंदीर

CD
धुळे ः टुडे १ साठी, ॲंकर -- फोटो क्रमांक ः 31923 धुळे : पांझरा नदीकिनारी हत्ती डोहापुढील श्री चामुंडामाता मंदीर. -- चोटीलाच्या श्री चामुंडामाता ज्योतीचे आज आगमन - शिवतीर्थस्थळी स्वागत : धुळ्यात श्री चामुंडामाता धर्मादाय ट्रस्टतर्फे नवरात्रोत्सव सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १० : देवपूरमधील हत्ती डोह परिसरातील पांझरा नदीकिनारी असलेल्या श्री चामुंडामाता मंदिरात यंदा नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त श्री चामुंडामाता धर्मादाय ट्रस्टतर्फे श्री चामुंडामाता मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, तयारी पूर्ण झाली आहे. दरम्यान, गुजरात येथील चोटीला येथील श्री चामुंडामाता मंदिरातून प्रज्वलित करण्यात आलेली पवित्र ज्योत रविवारी (ता. ११) सकाळी आठनंतर धुळे शहरात दाखल होणार आहे. बडगुजर समाजासह कुलदैवत असलेल्या भाविकांतर्फे या ज्योतीचे स्वागत केले जाणार आहे. - श्री चामुंडामाता धर्मादाय ट्रस्टतर्फे नवरात्रोत्सवानििमत्त नऊ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी नवरात्रोत्सव समिती २०२६ ची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्ष लोकेश सूर्यवंशी, स्वागत समिती अध्यक्ष विपीन बडगुजर नियोजन करीत आहेत. - स्वागत सोहळा, शोभायात्रा चोटीला मंदिरावरून आणली जाणारी ही ज्योत रविवारी सकाळी आठला धुळे शहरातील शिवतीर्थाजवळ दाखल होईल. तिथे तिचे स्वागत केले जाईल. त्यानंतर जुने धुळ्यालगत सुभाष पुतळ्यापासून ते श्री चामुंडामाता मंदिरापर्यंत सवाद्य ज्योतीची चैतन्यमयी वातावरणात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या ज्योतीचे पूजन आमदार अनुप अग्रवाल, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव यांच्यासह विविध मान्यवर आणि बडगुजर समाजबांधवांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. - उत्सवाची जय्यत तयारी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पांझरा नदीकाठच्या मंदिर परिसरात भाविकांच्या स्वागतासाठी विविध सुविधा व जय्यत तयारी करण्यात आली आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री चामुंडामाता धर्मादाय ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर, मनोहर बडगुजर, प्रा. एच. आर. बडगुजर, संजीव बडगुजर, ॲड. सुरेश बडगुजर, अभियंता प्रदीप चव्हाण, मल्ल सचिन बडगुजर, लक्ष्मण बडगुजर, प्रा. प्रशांत बडगुजर, श्याम बडगुजर, अमित बडगुजर, माधुरी बडगुजर, अनिता बडगुजर, कोमल बडगुजर, निता बडगुजर, छाया बडगुजर, कल्पना बडगुजर, मनीषा बडगुजर, वंदना बडगुजर, कुसुम बडगुजर आदी परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT