नाशिक

जयघोषात दुर्गामाता महादौड

CD
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक ः 33140 धुळे : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे झालेल्या श्री दुर्गामाता महादौडीत हाती भगवा ध्वज घेत सहभागी झालेले तरूण. -- धुळ्यात जयघोषात दुर्गामाता महादौड - ध्वजासह भगवे फेटे परिधानातून तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग - किंवा - धुळ्यात श्री दुर्गामाता महादौड - भगवे फेटे परिधानातून तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २० : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धुळे विभागातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवारी (ता. २०) पहाटे श्री दुर्गामाता महादौड पार पडली. भगवे फेटे आणि वारकरी टोप्या परिधान केलेले तरुण, धर्मप्रेमी या दौडीत सहभागी झाले. ‘भारतमाता की जय’ आणि ‘श्री दुर्गामाता की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. आग्रा रोडवरील मनोहर चित्र मंदिराजवळील श्री शिवछत्रपती स्मारकापासून पहाटे दौडीला प्रारंभ झाला. तेथून ही दौड आग्रा रोड, श्रीराम मंदिर, फुलवाला चौक, मोठा पूल, बापू भंडारी गल्ली, श्री एकवीरादेवी मंदिर, पंचवटी परिसर, मोठा पूल, गोल चौकी, सुभाष चौक, गल्ली क्रमांक सात, भांग्या मारुती चौक, माधवपुरा चौक, रामभाऊ दाढीवाला खुंट, गल्ली क्रमांक पाच आणि श्री तुळजाभवानी मंदिर या मार्गाने पुढे गेली. श्री एकवीरादेवी मंदिरात महाआरती करण्यात आली. नंतर विविध मार्गे जात या दौडचा पुन्हा श्री शिवछत्रपती स्मारक येथे समारोप झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीचे विचार तरुणांमध्ये रुजविणे, तसेच त्यांच्यात देशभक्तीची भावना जागृत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. हाती भगवे ध्वज घेऊन सहभागी झालेल्या शिवभक्तांमुळे संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs ZIMW 3rd T20I: भारताचा दणदणीत विजय; हरमनप्रीत, शफाली वर्माची फटकेबाजी; झिम्बाब्वेविरुद्धची मालिका ३-० ने खिशात

शनि मार्गी होताच ३ राशींचं नशीब पालटणार! रखडलेली कामं पूर्ण होणार, धनलाभाचे योग

Dasara Melava 2026: संजय राऊतांचा अमित शाहांवर हल्लाबोल; 'लॉरेन्स बिश्नोई अस्तित्वात नाही, अमित शाह हेच लॉरेन्स बिश्नोई'

Eknath Shinde : "शेतकऱ्यांच्या लेकींच्या लग्नाचा सर्व खर्च आमचा"; दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!

INDW vs ZIMW 3rd T20I: १० चौकार, ५ षटकार अन् ९१ धावा! हरमनप्रीत कौर रडली, चेहरा लपवताना दिसली; म्हणाली, त्या शब्दांनी...

SCROLL FOR NEXT