(पान ४ ला सेकंड मेन)
SHC26B13534
शिरपूर : रथाची महापूजा करताना आमदार काशीराम पावरा, न्यायाधीश एम. जी. चव्हाण, न्यायाधीश लोटस धनवे, न्यायाधीश पवन ढोरे व पदाधिकारी.
-----------
शिरपूरला ‘व्यंकट रमणा गोविंदा’चा जयघोषात
रथोत्सवाला सुरुवात; हजारो भाविकांनी घेतले दर्शन
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. २३ : ‘व्यंकट रमणा गोविंदा...बाळासाहेब महाराज की जय’च्या गजरात येथील वरचे गाव श्री व्यंकटेश बालाजी मंदिर संस्थानच्या रथोत्सवाला गुरुवारी (ता. २३) सकाळी प्रारंभ झाला. दिवसभरात हजारो भाविकांनी रथारुढ बालाजींचे दर्शन घेतले.
सकाळी वरचे गाव बालाजी मंदिराच्या परिसरात जळगाव येथील श्रीराम मंदीर संस्थानचे वहिवाटदार ह. भ. प. मंगेश महाराज तथा गुरू बाळकृष्ण महाराज जोशी, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. चव्हाण, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश श्रीमती लोटस धनवे, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पवन ढोरे यांच्या हस्ते रथाची महापूजा करण्यात आली. आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, प्रांताधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, सहायक निरीक्षक वर्षा पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, सभापती वासुदेव देवरे, संग्रामसिंह राजपूत, अरुण धोबी, राजू टेलर आदी उपस्थित होते.
महापुजेनंतर पदाधिकारी आणि भाविकांनी मानाची पाच पावले रथ ओढला. आरतीनंतर ब्रह्मवृंदाने केलेल्या मंत्रोच्चारात बालाजी महाराजांची मूर्ती रथातील सिंहासनावर आरुढ झाली. या वेळी भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. ढोल- ताशांच्या गजरात बालाजींचा रथ मिरवणुकीने पुढे नेण्यात आला.
संस्थानतर्फे रथोत्सवासाठी उपस्थित पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, रथ व मंदिराचे सेवेकरी, मानकरी आणि बलुतेदार यांचा समारंभपूर्वक सत्कार करण्यात आला. संस्थानला मदत करणाऱ्या देणगीदारांची माहिती देण्यात आली. शिक्षण सभापती श्यामकांत इशी, उत्तमराव माळी यांनी सूत्रसंचल केले. अध्यक्ष शरदकुमार अग्रवाल, कार्याध्यक्ष झेंडूसिंह पाटील, उपाध्यक्ष दिलीप लोहार, यू. एच. माळी, चिटणीस शामकांत ईशी, सह चिटणीस भूपेश अग्रवाल, कोशाध्यक्ष विशाल माहेश्वरी, सह कोशाध्यक्ष किरण दलाल, दिगंबर माळी, विजयसिंह राजपूत आदींनी संयोजन केले.
दिवसभरात पारंपरिक मार्गावरून रथाची मिरवणूक काढण्यात आली. सुवासिनींनी रथारूढ बालाजींचे औक्षण केले. भाविकांना केळीचा प्रसाद वाटण्यात आला. रथ ओढणारे सेवेकरी व भाविकांसाठी विविध मंडळे, दानशूर व्यक्तींनी उपाहार, शीतपेय आणि पेयजल व्यवस्था केली होती. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोरकुमार परदेशी व सहकाऱ्यांनी मोठा बंदोबस्त ठेवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.