लोगो : सिंहस्थ कुंभमेळा
सिंहस्थावर कॉफीटेबल बुक
गीताचेही लोकार्पण; ३१ ला ध्वजारोहणाने पर्वाचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पर्वाचा औपचारिक प्रारंभ ३१ ऑक्टोबरला ध्वजारोहणाने होणार आहे. या सोहळ्यानिमित्ताने सिंहस्थ कुंभमेळ्याची ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा उलगडणाऱ्या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन, तसेच सिंहस्थ गीताचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
नाशिकच्या रामतीर्थावर आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर एकाच वेळी ध्वजारोहण होणार आहे. त्यातून सिंहस्थ पर्वाला औपचारिक सुरुवात होईल. या सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ध्वजारोहणासह गोदावरी आरती, कुंभमेळा गीत, कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन आणि विशेष टपाल तिकिटाचे अनावरण असे विविध कार्यक्रमही नियोजित आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित होणाऱ्या कॉफीटेबल बुकमधून कुंभपर्वाचे महत्त्व, त्यामागील धार्मिक संकल्पना आणि नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या परंपरेची माहिती व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. सिंहस्थानिमित्ताने होणाऱ्या सांस्कृतिक उपक्रमांमध्ये कुंभमेळा गीतालाही महत्त्व आहे. गीताच्या माध्यमातून सिंहस्थाची परंपरा, आध्यात्मिक महत्त्व आणि उत्सवाचे स्वरूप जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
ध्वजारोहण सोहळ्यामुळे सिंहस्थाच्या तयारीला अधिकृत प्रारंभ होणार असून, आगामी पर्वाच्या नियोजनाकडे भाविकांचे आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कुंभमेळा गीताचे होणार लोकार्पण
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा या भव्य आणि आध्यात्मिक सोहळ्याची भव्यता जगभरात पोहोचवण्यासाठी एका विशेष अधिकृत ‘महाकुंभ गीताची’ निर्मिती करण्यात आली आहे. लोकप्रिय संगीतकार अजय-अतुल यांनी या विशेष कुंभगीताची रचना आणि संगीत दिग्दर्शन केले आहे. नाशिकची समृद्ध संस्कृती, पवित्र गोदावरी नदीचे महात्म्य, महाराष्ट्राचा आध्यात्मिक वारसा आणि कुंभमेळ्याची दिव्य ऊर्जा सुरांच्या माध्यमातून सादर होणार आहे. कुंभमेळ्यातील सर्व साधू, आखाड्यांचे प्रमुख आणि महंतांशी चर्चा करून, त्यांना हे गीत दाखवूनच अंतिम रूप दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.