नाशिक

Nashik Crime News : मालेगावातील ‘सिमी’ कार्यकर्त्यांची ‘एटीएस’कडून रात्रभर चौकशी; छायाचित्रण करून रेकीचा संशय

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : शहरातील ‘सिमी’चा कार्यकर्ता व येथील बडा कब्रस्तानमध्ये २००६ मध्ये झालेल्या बॉँबस्फोटातील संशयित सलमान नावाच्या तरुणाला ‘एटीएस’ने मध्यरात्री ताब्यात घेतले.

गणेशोत्सवाच्या पहिल्याच रात्री दहशतवादी कारवाईच्या संशयावरून तसेच रेल्वेने जात असताना मनमाड येथील गणेशमंडळांचे छायाचित्रण करून रेकी केल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आले. पहाटेपर्यंत कसून चौकशी व काही प्रश्नोत्तरे करून त्याला सोडून देण्यात आले. (Simi activists in Malegaon were interrogated by ATS nashik crime news)

शहरात बुधवारी (ता. २०) या घटनेची जोरदार चर्चा होती. सलमान रेल्वेने प्रवास करीत असताना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. मनमाड येथे त्याने काही गणेशमंडळांचे छायाचित्रण केले. रेल्वे प्रवासात असतानाच येवला तालुक्यातील नगरसूल रेल्वेस्थानकावरून रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आले.

‘एटीएस’च्या पथकाने त्याची कसून चौकशी केली. सलमान शहरातील बडा कब्रस्तान परिसरात सप्टेंबर २००६ मध्ये शब-ए-बरातला झालेल्या बॉँबस्फोटाच्या गुन्ह्यात संशयित होता.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)च्या चौकशी व न्यायालयाच्या निकालानंतर सलमानसह सर्व संशयितांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे.

शहरातील सिमी, पीएफआयच्या कार्यकर्त्यांवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. मध्यंतरी रझा ॲकॅडमीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवरही कारवाई करण्यात आल्याने मोठा असंतोष निर्माण झाला होता. दरम्यान, सलमानची नव्याने चौकशी करण्याची गरज भासल्यास ‘एटीएस’ त्याला पुन्हा चौकशीसाठी मुंबईला बोलवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PPF vs ELSS vs NPS: 5,000 रुपयांची दरमहा गुंतवल्यास कुठे मिळेल जास्त परतावा? 15 वर्षांत किती तयार होईल फंड

Ankshastra : 'या' 3 मुलांकाचे लोक असतात प्रचंड कृतघ्न; चांगुलपणाची कधीच करत नाहीत परतफेड, मित्र म्हणून मदत करण्यापूर्वी नक्की करा विचार

Latest Marathi News Live Update : हे बिल दलित आणि मागासवर्गीय लोकांच्या हिताचे नाही - राहुल गांधी

Indian Railways Free journey : 'या' लोकांना रेल्वेने मोफत प्रवास करता येणार, वाचणार हजारो रुपये; काय आहे MST योजना?

MPSC Success Story: ऊसतोड मजुराच्या मुलाची जिद्दीची कमाल; तांड्यावरून न्यायालयापर्यंतचा प्रवास, ज्ञानेश्वर चव्हाण झाले न्यायाधीश!

SCROLL FOR NEXT