नाशिक

‘स्मृतींच्या काव्य वाटा’ने रसिकांचे वेधले लक्ष

CD
पान चार -------------------- 33055 नाशिक : ‘स्मृतींच्या काव्य वाटा’ कार्यक्रमात कवितेला नाट्यातून सादर करताना कलाकार ‘स्मृतींच्या काव्य वाटा’ने रसिकांचे वेधले लक्ष गायन, नृत्य, नाट्याविष्काराने संमेलनाचा समारोप सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२० सार्वजनिक वाचनालय आयोजित ५७ व्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचा समारोप ‘स्मृतींच्या काव्य वाटा’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाने करण्यात आला. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात (ता.१९) सायंकाळी कार्यक्रम रंगला. कवी राजू देसले यांच्या संहितेवर आधारित कार्यक्रमाचे दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले होते. निवेदन सदानंद जोशी यांनी केले. नृत्य दिग्दर्शन कीर्ती भवाळकर, शैलेंद्र गौतम यांचे नेपथ्य, आनंद अत्रे यांचे संगीत तर, प्रकाशयोजना विनोद राठोड यांची होती. ऋषिकेश गांगुर्डे यांच्या पार्श्वसंगिताने कार्यक्रमाला कलात्मक उंची मिळाली. श्रीराम वाघमारे आणि लक्ष्मण कोकणे यांनी व्यवस्थापन केले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, कवी गोविंद, सोपानदेव चौधरी, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, वामनदादा कर्डक, बाबूराव बागुल, किशोर पाठक, आनंद जोर्वेकर, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, अरुण काळे, कमलाकर देसले, प्रियांका डहाळे अशा विविध कवींच्या साहित्यविश्वाचा वेध या अनोख्या कार्यक्रमातून घेण्यात आला. देवा घरचे न्यात कुणाला, वेडात मराठे वीर, आली कुठूनशी कानी, परब्रह्म भेटी लागे, सुंदर मी होणार, तशी माझी आई, मागे वळून पाहतांना, बाबासाहेब, गांधी, वेदा आधी तू होतास यासारख्या अनेक कवितांना नृत्य, नाट्य, गायनातून रसिकांसमोर सादर करण्यात आले. कवितेतील आशयाला स्वरांची साथ, नृत्याची लय आणि नाट्याची अभिव्यक्ती लाभल्यामुळे हा कार्यक्रम केवळ काव्यवाचनापुरता मर्यादित न राहता बहुआयामी कलानुभव देणारा ठरला. पन्नास कलावंतांच्या सहभागाने कार्यक्रम गुंफण्यात आल्याने उपस्थित रसिकांना निराळा अनुभव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनाबाबत अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा! आता दिवाळीपर्यंत...

Space War : मोबाईलचे जाळे आणि जीपीएस होणार गुल? अवकाशातील वाढत्या संघर्षामुळे जगासमोर मोठे संकट!

PAK vs ENG : बाबर आझम पुन्हा फेल गेला... पण, एक असा विक्रम ज्यात शुभमन गिलच्या पंक्तीत जाऊन बसला; Video

Tiger Shroff Attack: टायगर श्राफवरील गोळीबारानंतर हल्लेखोरांनी हँडलर्सना काय पाठवला संदेश?

Latest Marathi News Live Update : धनंजय मुंडेंचा फार सहन केलं, 'अब हवा का रुख बदल रहा है' म्हणत कोणाला इशारा?

SCROLL FOR NEXT