caller tune esakal
नाशिक

तुम्हाला कोरोना कॉलर ट्यूनपासून सुटका हवीय? करा हा उपाय

प्रमोद दंडगव्हाळ

नाशिक : मागील गेल्या दीड वर्षांपासून मोबाईलधारक कोरोनासंदर्भात (Corona virus) विविध प्रकारचे संदेश देणाऱ्या कॉलर ट्यून (corona message caller tune) ऐकून- ऐकून कंटाळले आहेत. यावर आता तात्पुरता लोकल (गावठी) उपाय शोधून काढण्यास काही प्रमाणात यश आले आहे. याचा वापर केल्यास नक्कीच काही प्रमाणात का होईना, या कॉलर ट्यूनपासून मोबाईलधारकांना मुक्तता मिळण्यास मदत होणार, यात शंका नाही. (solution-to-stop-corona-caller-tune-nashik-marathi-news)

कोरोना कॉलर ट्यून सर्वांनाच कंटाळवाणी

भारतात कोरोना आला आणि एकच हाहाकार उडाला. कोरोना आजार नेमका काय आहे, यासंदर्भात अनेक जण अनभिज्ञ होते. यासाठी केंद्र व राज्य सरकार वारंवार जाहीर आवाहन करून लोकांपर्यंत जनजागृती करीत आहे. यासाठी विविध माध्यमांचा त्यांनी वापर केला आहे. त्यामधील सर्वांत महत्त्वाचा व लोकांच्या थेट कानापर्यंत माहिती देणारे माध्यम म्हणजे प्रत्येकाच्या हातात असलेला मोबाईल होय. कोरोनासंदर्भाची कॉलर ट्यून व त्यात सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांचा आवाज सुरवातीला काही काळासाठी चांगला व सुमधुर वाटला. नंतर मात्र ही कॉलर ट्यून सर्वांना कंटाळवाणी ठरली. असे असले तरी कोरोनाचे प्रमाण कमी होऊनही कॉलर ट्यून मात्र काही करता बंद होण्याचे नाव घेताना दिसत नाही. हे बघून अखेर एक यावर जालीम उपाय तात्पुरत्या स्वरूपात का होईना मोबाईलधारकांना दिलासादायक ठरणार, यात शंका नाही.

...असा करा प्रयोग!

समोरच्या मोबाईलधारकाला प्रथम फोन लावा. नंतर समोरून कोरोनासंदर्भात कॉलर ट्यून ऐकू येताच लगेच फोन कट करा. त्यानंतर पुन्हा लगेच फोन लावा. आता कॉलरट्यून ऐकू न येता डायरेक्ट रिंग वाजणार. चला तर मग, करून बघा हा प्रयोग!

(solution-to-stop-corona-caller-tune-nashik-marathi-news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मल्लिकार्जुन खरगेंच्या 'त्या' विधानावरून वाद पेटला! अमित शहांसह भाजपचे नेते आक्रमक; म्हणाले...

Pune News: माळेगावात वनपाल सहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ; शेतातील माती वाहतुकीत अडथळा न आणण्यासाठी मागितले पैसे

MI NEXT CAPTAIN: मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार कोण? माजी खेळाडूने सांगून टाकलं नाव; रोहित शर्मा अन् हार्दिक पांड्याबद्दल मोठं वक्तव्य!

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT