नाशिक

सोनगीर वालखेडा रस्त्याची दुरवस्था

CD
SGR26B07580 धुळे : कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देताना डोंगरगावचे माजी सरपंच प्रकाश पाटील. ------- सोनगीर- वालखेडा रस्त्याची दुरवस्था सोनगीर, ता. १५ : सोनगीर ते वालखेडा या सुमारे दहा किलोमीटर रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, या मार्गावरून दुचाकीसह अन्य वाहन चालवणे धोक्याचे व कसरतीचे ठरत आहे. याप्रकरणी डोंगरगावचे (ता. शिंदखेडा) माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन तत्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. सोनगीर ते अमळनेर हा ३५ किलोमीटरचा मार्ग वालखेडाहून जातो. धुळे ते जळगाव जिल्हा जोडणारा हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने वाहतूक जास्त आहे. या मार्गावर शिंदखेडा तालुक्यातील वाघाडी (खुर्द व बुद्रुक), वालखेडा, डोंगरगाव, कंचनपुर, वाघोदे, तर अमळनेर तालुक्यातील मांडळ, वावडे, तरवाडे, शिरसाळे व झाडी, दुसऱ्या मार्गाने मुडी, गलवाडे, झाडी, अमळनेर असा मार्ग आहे. ग्रामीण जनतेला धुळे अथवा अमळनेर जाण्यासाठी एकमेव मार्ग आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल व वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. रस्त्याची त्वरित दुरूस्ती व्हावी, अशी मागणी माजी सरपंच प्रकाश पाटील यांनी निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात सोलापूरच्या 'मटका किंग'चं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून उडाळी खळबळ, मंदिरातील अनागोंदी कारभाराविरोधात संताप

Yunus Shaikh: कैसे हराया... फेम सहर शेखच्या वडिलांना शिंदेसेनेत मानाचं पान, युनूस खान यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

South Solapur News: गॅस सिलिंडरच्या स्फोटात घर जळून खाक; कोळी कुटुंबाच्या मदतीला धावले महादेव कोगनुरे

Latest Marathi News Update : ज्ञानेश कुमारांमुळे मोदी सत्तेत आले : अभिजीत दिपके

Pune Leopard News: सिंहगडाच्या पश्चिमेकडे बिबट्याची दहशत; तासाभरात तीन दुचाकीस्वारांवर हल्ले, युवती जखमी

SCROLL FOR NEXT