deepak pandey esakal
नाशिक

विशेष पोलिस अधिकाऱ्यांना नागरिकांना मारण्याचा अधिकार नाही

प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : विशेष पोलिस अधिकारी (Special police officers) हे पोलिसांचे मदतनीस म्हणून काम करत आहेत. त्यांना नागरिकांना (citizens) मारण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसल्याची स्पष्टोक्ती पोलिस आयुक्त दीपक पांडे (deepak pandey) दिली. सिडकोतील विशेष पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आयोजित कार्यक्रमात संवाद साधताना ते बोलत होते.

विशेष पोलिस अधिकाऱ्यांना नागरिकांना मारण्याचा अधिकार नाही

कोरोना दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाउन सुरू आहे. अशा परिस्थितीत काही लोक, तसेच टवाळखोर विनाकारण रस्त्यांवर किंवा चौकाचौकात फिरताना आढळून येत आहेत. त्यांना पोलिस प्रशासनातर्फे काठीचा प्रसाददेखील दिला जात आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे संपूर्ण शहरात ही मोहीम राबवली जात आहे. अशातच पोलिसांसमवेत खांद्याला खांदा लावून विशेष पोलिस अधिकारी म्हणून तरुण वर्ग कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. त्यांचे मनोबल वाढविण्याकरिता आयुक्तांनी माऊली लॉन्स येथे विशेष पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी उपायुक्त पौर्णिमा चौगुले, विजय खरात, अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त दीपाली खन्ना, मोहन ठाकूर, समीर शेख, सोहेल शेख, अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी, निरीक्षक कमलाकर जाधव, श्रीकांत निंबाळकर आदींसह अंबडचे अधिकारी, कर्मचारी, विशेष पोलिस अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: डहाणू-विरार लोकल प्रवास आरामदायी होणार, पश्चिम रेल्वेवर पहिली १५ डब्यांची ट्रेन सुरू; प्रवाशांना दिलासा

बाऊन्सरपेक्षा 'तिला' घाबरतो! भर कार्यक्रमात चेन्नईच्या कर्णधाराने दिली कबुली; पाहा व्हिडिओ...

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना ! ९ वर्षांच्या मुलीची वडिलांकडून निर्घृणपणे हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी घर पेटवले

Konkan Hapus Festival : कोकण हापूसचा सुगंध दिल्लीत दरवळला! हजार डझन आंबा तीन तासांत संपला; आंब्याचा सध्या कसा आहे दर?

6 महिन्याची गर्भवती असताना अभिनेत्री जीममध्ये करतेय वर्कआऊट, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT