Raisins Production esakal
नाशिक

Nashik Agriculture News : बेदाणानिर्मिती हंगामाच्या पूर्व तयारीला वेग! निफाड तालुक्यात शेड उभारणीचे काम सुरू

निफाड तालुक्यात बेदाणा हंगाम जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो, पण फळछाटणी वेळी बरसलेला पाऊस, थंडीमुळे द्राक्षांचा हंगाम १५ दिवस लांबणीवर पडला आहे.

एस. डी. आहिरे

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील द्राक्षांच्या हंगामाचा ‘श्रीगणेशा’ येत्या आठ दिवसांत होणार आहे. द्राक्षाचे उपउत्पादन असलेल्या बेदाणानिर्मिती हंगामाच्या पूर्व तयारीला वेग आला आहे.

सध्या बेदाणा शेडची उभारणी, दुरुस्ती आदी कामे बेदाणा उत्पादकांकडून सुरू आहेत. परराज्यातून दहा हजार मजूर लवकरच निफाड तालुक्यात दाखल होणार आहेत.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून बेदाणा शेडनिर्मितीला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. (Speed ​​up preparations for raisins production season Shed construction work started in Niphad taluka Nashik Agriculture News)

निफाड तालुक्यात बेदाणा हंगाम जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होतो, पण फळछाटणी वेळी बरसलेला पाऊस, थंडीमुळे द्राक्षांचा हंगाम १५ दिवस लांबणीवर पडला आहे. परिणामी, बेदाणा हंगाम लांबणीवर पडल्याचे चिन्हे आहेत.

सुमारे तीन महिने बेदाणानिर्मिती सुरू असते. निफाड तालुक्यात यंदा द्राक्षबागांमागे संकटाचे शुक्लकाष्ट लागले आहे. द्राक्ष उत्पादनात घट संभवते. निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंत, उगाव, कसबे सुकेणे, पालखेड येथे मोठ्या प्रमाणात बेदाण्याचे उत्पादन घेतले जाते.

कडाक्याच्या थंडीत सध्या बेदाणानिर्मिती शेडची उभारणी व डागडुजी सुरू आहे. बेदाणानिर्मिती पारंगत असलेले सुमारे दहा हजार मजूर आठवड्याभरात दाखल होतील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बेदाणानिर्मितीची लगबग सुरू होणार आहे.

यंदा सुमारे ४०० शेडची उभारणी होणार असून, १५ हजार टन बेदाणा एकट्या निफाड तालुक्यात तयार होण्याची चिन्हे आहेत. बेदाणा निर्मितीसाठी लागणारे सल्फर व इतर कच्चा माल विक्रीसाठी आला आहे.

"मागील वर्षी बेदाणानिर्मिती काळात अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे दर्जा घसरला होता. बाजारभावावर त्याचा परिणाम झाल्याने मागील वर्षी उत्पादकांचा खर्चही निघाला नाही. यंदाच्या हंगामात दर मिळण्याची अपेक्षा आहे."- राजेंद्र घुमरे, बेदाणा उत्पादक, उगाव

"नाशिकच्या पिवळ्या बेदाण्याने आतंरराष्ट्रीय बाजारपेठेत पसंती मिळविली आहे. दर्जा चांगला राहीला, तर निर्यात होऊन बेदाण्याला यंदा चांगला दर मिळण्याची चिन्हे आहेत."

-शीतलकुमार भंडारी, बेदाणा व्यापारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT