शून्यातून उभारला ‘स्पृहा ऑरगॅनिक’चा ब्रँड
-----------------------------------
कविता भामरे यांचा ११ वर्षांचा यशस्वी प्रवास
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी जिद्द आणि सातत्याची जोड आवश्यक असते. याच बळावर नाशिक येथील कविता सुहास भामरे यांनी ‘Spruha Organic Handmade All Skin Beauty Products’ या ब्रँडच्या माध्यमातून गेल्या ११ वर्षांत आपला व्यावसायिक प्रवास यशस्वीपणे पुढे नेला आहे.
व्यवसायाची सुरुवात करताना त्यांच्याकडे मोठी साधनसामग्री, स्वतंत्र टीम किंवा व्यावसायिक अनुभव नव्हता. मात्र, स्वतःच्या मेहनतीतून विश्वासार्ह उत्पादने तयार करून ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याचे ध्येय त्यांनी निश्चित केले होते. सुरुवातीच्या काळात नवीन ग्राहक मिळविणे, उत्पादनांची गुणवत्ता टिकविणे आणि व्यवसायातील विविध बाबी शिकणे अशी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर होती. अडचणींमुळे खचून न जाता प्रत्येक अनुभवातून शिकत त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली.
या प्रवासात त्यांच्या पतीने आणि मुलांनी दिलेली साथ मोलाची ठरली. कुटुंबाचा विश्वास, प्रोत्साहन आणि सहकार्य यामुळे कठीण प्रसंगांतही त्यांना पुढे जाण्याचे बळ मिळाले. व्यवसाय उभारताना कुटुंबाची साथ हीच आपली सर्वांत मोठी ताकद असल्याचे भामरे यांच्या प्रवासातून दिसून येते. हळूहळू त्यांच्या उत्पादनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचू लागली. ग्राहकांकडून मिळणारा प्रतिसाद, अभिप्राय आणि विश्वास यामुळे व्यवसायाला पुढे नेण्याची प्रेरणा मिळाली. प्रत्येक नवीन ऑर्डर आणि ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद त्यांच्यासाठी प्रगतीची नवी संधी ठरला. विशेष म्हणजे, ‘स्पृहा’ हे नाव त्यांनी आपल्या मुलीच्या नावावरून ठेवले आहे. त्यामुळे हा ब्रँड त्यांच्या मेहनतीसोबतच कुटुंबाशी जोडलेल्या भावनांचेही प्रतीक आहे.
आज ११ वर्षांचा टप्पा गाठल्यानंतरही कविता भामरे यांची मोठी स्वप्ने पूर्ण करण्याची धडपड कायम आहे. प्रामाणिकपणा, चिकाटी आणि ग्राहकांचा विश्वास यांच्या बळावर ‘Spruha Organic’ची वाटचाल सुरू असून, शून्यातून व्यवसाय उभारू इच्छिणाऱ्यांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.
9270421765 kavitasbhamare16@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.