NMC Nashik News esakal
नाशिक

NMC Ring Road News : महापालिकेने थांबविले रिंगरोडचे सर्वेक्षण; राज्य रस्ते विकास महामंडळ करणार काम

सकाळ वृत्तसेवा

NMC Ring Road News : शहराची वाढती वाहतूक बाह्य भागाकडून वळविण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्रस्तावित ५६ किलोमीटर बाह्य रिंग रोडचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत केले जाणार असल्याने महापालिकेने सर्वेक्षणाचे काम थांबविले आहे.

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात येणारी वाहतूक बाह्य रिंगरोडद्वारे वळविण्यासाठी २६ व ३० किलोमीटरचे दोन असे एकूण ५६ किलोमीटरचे रिंगरोड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने महापालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला. (State Road Development Corporation will do ring road work nmc news)

त्यापूर्वी ५६ किलोमीटर रस्त्याचे सर्वेक्षण केले जाणार आहे. बाह्य रिंगरोड तयार करताना मोठ्या प्रमाणात भूसंपादन करावे लागणार आहे. काही भाग शहरी, तर काही ग्रामीण भागातून जात असल्याने त्यानुसार अनुक्रमे दुप्पट व चौप्पट मोबदला द्यावा लागणार आहे. रिंगरोडसाठी भूसंपादनासह जवळपास साडेचार हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

महापालिकेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी नसल्याने टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याची तयारी करण्यात आली. परंतु दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बाह्य रिंगरोड तयार करण्याचा निर्णय जाहीर केल्याने महापालिकेने सुरु केलेले सर्वेक्षण थांबविण्याच्या सूचना रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) दिल्या आहेत.

सिंहस्थ परिक्रमा मार्ग नामकरण

महापालिकेची आर्थिक स्थिती नसल्यामुळे रिंगरोड आता पूर्णपणे एमएसआरडीसीकडूनच होणार असून, त्यासाठी शासन एमएसआरडीसीला आर्थिक मदत देणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

राज्य सरकारकडून सिंहस्थांसाठी निधी दिला जातो. या निधीतूनच रिंगरोड केला जाणार असून, त्यासाठी रिंगरोडचेही नामकरण आता सिंहस्थ रिंगरोड ऐवजी ‘सिंहस्थ परिक्रमा मार्ग’ असे केले आहे.

असा आहे रिंगरोड

टप्पा-१-(साठ मीटर)- महापालिका खत प्रकल्पापासून पाथर्डी शिवारातून वालदेवी नदीला समांतर पिंपळगाव खांब शिवार, तसेच पुढे वालदेवी नदी पलीकडे विहीतगाव शिवार, विहीतगावापासून पुढे नाशिक-पुणे महामार्ग ओलांडून चेहेडी शिवारातून पंचक गाव पुढे, माडसांगवी शिवारातून महापालिका हद्दीबाहेर औरंगाबाद रोडलगत आडगाव शिवार व ट्रक टर्मिनसपर्यंत.

टप्पा-२- (३६ मीटर)- आडगाव ट्रक टर्मिनस येथून आडगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, नाशिक तालुक्यातील जलालपूर, बारदान फाटा, गंगापूर रोड, ओलांडून गंगापूर उजवा तट कालवा, सातपूर एमआयडीसी, पश्चिम भागालगत त्र्यंबक रोडपर्यंत व पुढे गरवारे पॉइंटपर्यंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

Rajya Sabha Election: विदर्भातून राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या तंबूत तीव्र लॉबिंग सुरू, 'या' तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Latest Marathi News Live Update : अक्षता टाकण्यापूर्वीच वरपित्याचा मृत्यू..!

Thane News: वालधुनी नदीवर घाट उभारणीस अडथळा, ३० घरांना नोटीसा; दोन दिवसांत घरे रिकामी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT