nashik crowd esakal
नाशिक

...तर जिल्‍ह्यात पुन्‍हा कठोर निर्बंध

अरूण मलाणी

नाशिक : पॉझिटिव्‍हिटी रेट ( corona positivity rate) घटल्‍याने जिल्‍ह्यात निर्बंध शिथिल केल्यावर, पहिल्‍याच दिवशी मंगळवारी (ता. १) मोठी गर्दी झाली. त्‍यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. गर्दीच्‍या पार्श्वभूमीवर या शुक्रवार (ता. ४)पर्यंत ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका जिल्‍हाधिकाऱ्यांनी घेतली आहे.(Strict-restrictions-will-be-imposed-District-Collector-clarified-nashik-marathi-news)

....तर पुन्‍हा लॉकडाउन लावत कठोर निर्बंध लागू

गेल्‍या दीड महिन्‍यापासून जिल्‍ह्यात निर्बंध लागू असल्‍याने अत्‍यावश्‍यक व जीवनावश्‍यक वस्‍तू सेवा मर्यादित वेळेसाठी उपलब्‍ध होत होत्‍या. रेड झोनमधून नाशिक बाहेर आल्‍याने मंगळवार (ता. १)पासून निर्बंध शिथिल करत सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी दिली. मात्र, पहिल्‍याच दिवशी तुडुंब गर्दी झाल्‍याने जिल्‍हाधिकारी मांढरे यांनी चिंता व्‍यक्‍त केली. नियमांचे पालन होत नसेल, तर जिल्‍ह्यात पुन्‍हा लॉकडाउन लावत कठोर निर्बंध लागू केले जातील, असे जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांनी स्‍पष्ट केले.

कोरोनाचा प्रसार होण्याची शक्‍यता

गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. असे झाल्‍यास जिल्‍ह्याचा पॉझिटिव्‍हिटी दर १० टक्क्‍यांपेक्षा अधिक जाण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे. असे झाल्‍यास पुन्‍हा जिल्‍ह्यात कठोर निर्बंध लागू करावे लागतील. या संदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही जिल्‍हा प्रशासनास आदेश दिले होते. पहिल्‍याच दिवशी झालेल्‍या गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणेची डोकेदुखी वाढण्याची शक्‍यता आहे. गर्दीची स्‍थिती पाहता येत्‍या दोन-चार दिवसांत नागरिकांनी नियमांचे पालन न केल्‍यास पुन्‍हा निर्बंध कठोर केले जातील, असे संकेत जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

निर्बंध शिथिल करताच पहिल्‍याच दिवशी नागरिकांचा प्रतिसाद बघता, शुक्रवारपर्यंतच अनलॉक सुरू राहील असे वाटते. सद्यःस्थितीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोनशेने वाढली, तरी पॉझिटिव्‍हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा अधिक होईल. त्यामुळे नाशिककरांनी नियम पालन करत सहकार्य करावे. -सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tajmahal Case: ताजमहलची ऐतिहासिक केस ४२ वर्षांनंतर संपली! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; आज फ्री एंट्री

IPL 2026 News: अरे त्या, दीपक चहर, शार्दूल ठाकूरला पैसे द्या अन् घरी पाठवा! Mumbai Indians वर दिग्गजाचा पारा चढला; म्हणाले...

Heritage Travel: कुठे आहे महाभारतातील लाक्षागृह? उलगडणार ४००० वर्षे जुन्या संस्कृतीचे रहस्य! 'हेरिटेज ट्रेल'मधून युवकांना मिळणार रोजगार!

Skincare: उसाच्या चिपाडांतून आता उजळणार चेहरा! शास्त्रज्ञांनी शोधली स्वस्त पद्धत; शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणार भर!

Ayan Ahmed: एक सल्ला, नंतर 'तो' मॅसेज अन् सापळा... अयान अहमदनं तरुणींना जाळ्यात कसं ओढलं? पडद्यामागचा सल्लागार लव्हगुरू कोण?

SCROLL FOR NEXT