suicide esakal
नाशिक

पिळकोस येथील शेतमजुराची आत्महत्या

खंडु मोरे

खामखेडा (जि. नाशिक) : पिळकोस (ता. कळवण) येथील आदिवासी वस्तीतील दादाजी कारभारी मोरे (वय ३७) या शेतमजुराने स्वतःच्या पत्र्याच्या राहत्या घरात दुपारी दोनला पत्नी व मुलगी शेतमजुरीस गेलेले असताना घरात एकटे असल्यावर घराच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळ्याला गळफास (Hang) लावून घेऊन आत्महत्या (Suicide) केली. (Suicide of a farm laborer at Pilkos Nashik News)

याबाबतीत वृत्त असे, की पिळकोस येथील आदिवासी वस्तीत राहणारे दादाजी मोरे यांनी दुपारी दोनला घरातील सर्व शेतमजुरीसाठी गेलेले असताना स्वतःच्या घरातच लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. घराजवळ राहणारे मोरे यांचे मोठे भाऊ बापू मोरे यांना त्यांच्या भावाने आत्महत्या केल्याचे समजल्यावर या घटनेची खबर पोलिस ठाण्यात पोलिसांना दिली. कळवण पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. मृत दादाजी मोरे यांचे कळवण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, आई, भाऊ, भावजाई, मुलगा, मुलगी, पुतण्या असा मोठा परिवार आहे. कळवण पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली डी. वाय. बोरसे, सुरेश पवार, वाघमारे, बागूल करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mahayuti Manifesto : महायुतीचा वचननामा जाहीर; मराठी माणसाला मुंबईतच घर ते बेस्ट प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत अन् बरंच काही...

Sunil Tatkare : नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी 'महायुती'ला साथ द्या; सुनील तटकरेंचे नाशिककरांना आवाहन

Insta Data Leak : इंस्टाग्राम वापरणाऱ्यांनो! १.७५ कोटी लोकांची माहिती लिक; डार्क वेबवर विक्री, हॅकरच्या 'या' मेसेजपासून सुरक्षित राहा

गरम अन्नासाठी Aluminum Foil किंवा Containers वापरता? ही सवय किडनीसह संपूर्ण आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक; तज्ज्ञांचा इशारा

Viral Video : बांगलादेश सुरक्षेच्या नावाने बोंबलतेय, इथे न्यूझीलंडचे खेळाडू भारतात बिनधास्त फिरतायेत; नेटिझन्स शेजाऱ्यांना डिवचतायेत

SCROLL FOR NEXT