‘सूर्या’विरोधात ‘आयएमए’ आक्रमक
आक्षेपार्ह दृश्ये वगळण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २४ : अभिनेता सनी देओल यांच्या आगामी ‘सूर्या- अंत से आरंभ तक’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये वैद्यकीय क्षेत्राची बदनामी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचाराचे उदात्तीकरण केल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) केला आहे.
यासंदर्भात आक्षेप घेत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र पाठवून चित्रपटाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात आयएमएने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की वैद्यकीय क्षेत्रातील त्रुटींवर कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना चित्रपटात थेट हिंसेचे समर्थन करणे चुकीचे व एकांगी आहे. अशा भडक चित्रणामुळे डॉक्टर व रुग्णांमधील विश्वास धोक्यात येऊन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने यातील आक्षेपार्ह भाग वगळावा किंवा चित्रपटावर बंदी घालावी. ‘आयएमए’ चे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. मंगेश थेटे म्हणाले, की वैद्यकीय चुकांवर दाद मागण्यासाठी न्यायपूर्ण व्यासपीठे असताना टीझरमध्ये वैयक्तिक हिंसाचार दाखवणे अयोग्य आहे. अशा भडक चित्रपटांमुळे डॉक्टर-रुग्ण सुसंवादास बाधा पोहोचेल व रुग्णालयांवरील हल्ले वाढण्याची भीती आहे. न्यायालयानेही अशा हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. सेन्सॉर बोर्डाने आक्षेपार्ह भाग वगळून योग्य कारवाई करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.