Death News esakal
नाशिक

Nashik News : गंगापूर कॅनॉल मध्ये आढळला दुचाकी सह संशयास्पद मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : मखमलाबाद शिवारात असलेल्या गंगापूर कॅनल डावा तट कोरड्या पाटात गुरुवारी (ता. १२) पहाटे चाळीसवर्षीय इसमाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदर मृताच्या डोक्यावर लागलेले असल्याने तो अपघात होऊन पाटात पडून मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर साहेबराव कराड, असे मयत व्यक्तीचे नाव आहे. कराड हे कराड मळा येथील शासकीय नर्सरीजवळ राहतात. रात्री कराड घरी न आल्याने त्याचे कुटुंबीय शोध घेत होते. (Suspicious body found in Gangapur canal with two wheeler Nashik News)

गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

पहाटे पाचला कराड यांचा कोरड्या पाण्याच्या पाटात मृतदेह आढळला. कराड याचा भाऊ दीपक ज्ञानेश्वर कराड याने म्हसरूळ पोलिस ठाण्यात माहिती दिली.

ज्या पाटात मृतदेह आढळून आला तेथेच कराड वापरत असलेली दुचाकी मिळाली आहे. कराड याचे शवविच्छेदन झाल्यावर मृत्यूचे कारण पुढे येईल, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT