पान-३--ॲंकर
--------------
NPH26B08811
निफाड ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे येथे झालेल्या रब्बी हंगामपूर्व नियोजन बैठकीस उपस्थित शेतकरी आणि विद्यापिठाचे अधिकारी.
--------------------
कृषी विद्यापिठाचे तंत्रज्ञान वापरल्यास उत्पन्नाची हमी
------------
डॉ. बोडके ः महात्मा फुले कृषि विद्यापीठातर्फे रब्बीपूर्व हंगाम नियोजन, मार्गदर्शन
-----------
सकाळ वृत्तसेवा
निफाड, ता.२० ः नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, एकात्मिक शेती पद्धती, तसेच पिकांच्या गरजेनुसार पाण्याचा वापर आणि विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केल्यास शाश्वत उत्पादन मिळू शकते असे प्रतिपादन विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी येथे केले.
------------
कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या प्रेरणेने सेवा संकल्प अभियान ः २०२६ अंतर्गत श्रमसाफल्य शेतकरी शास्त्रज्ञ मंचच्या रब्बीपूर्व हंगाम नियोजन बैठक व चर्चासत्राप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष वैकुंठ पाटील, निफाड कारखान्याचे माजी अध्यक्ष माणिकराव बोरस्ते, उपविभागीय कृषी अधिकारी भटू पाटील, सहयोगी संशोधन संचालक डॉ. अविनाश कोळगे, प्रभारी अधिकारी डॉ. रवींद्र पाटील, डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सचिन हिरे,गहू विशेषज्ञ प्रा. भालचंद्र मस्के, निफाडचे कृषी अधिकारी संदीप मोगल आदी उपस्थित होते.
डॉ. बोडके यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान, विकसित केलेले विविध वाण आणि कृषी निविष्ठांचा योग्य वापर यावर प्रामुख्याने भर दिला. जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी सेंद्रिय निविष्ठांसोबत विद्यापीठाने विकसित केलेले फुले बायोमिक्स तसेच इतर जैविक कीटकनाशके व बुरशीनाशकांच्या वापराबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, एकात्मिक शेती पद्धती, तसेच पिकांच्या गरजेनुसार पाण्याचा वापर आणि विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केल्यास शाश्वत उत्पादन मिळू शकते.
डॉ. कोळगे यांनी रब्बी हंगामातील पिके व त्यांच्या नियोजनाविषयी माहिती दिली. डॉ. रवींद्र पाटील यांनी द्राक्ष व कांदा पिकांबाबत मार्गदर्शन केले. डॉ. हिरे यांनी डाळिंब व्यवस्थापनाची माहिती दिली. प्रा. म्हस्के यांनी कीड व्यवस्थापन व जैविक निविष्ठांचा वापर, डॉ. पोपट खंडागळे यांनी रोग व्यवस्थापन, तर डॉ. नीलेश मगर यांनी गव्हाच्या सुधारित वाणांविषयी मार्गदर्शन केले.
भटू पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. संदीप मोगल यांनी एफएफएस या खत खरेदी ॲपविषयी सविस्तर माहिती दिली. सचिन मोगल यांनी शेतकऱ्यांतर्फे मनोगत व्यक्त केले. शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य तसेच कसबे सुकेणे व मौजे सुकेणे येथील शेतकरी उपस्थित होते. हा कार्यक्रम शामराव मोगल यांच्या शेतावर आयोजित करण्यात आला. डॉ. भरत मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मगर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी संशोधन केंद्राचे बाळू झडे, वरिष्ठ संशोधन साहाय्यक राजेंद्र लोखंडे, कृषी साहाय्यक संजय वाघ, अनिल पाटील, चंद्रकांत बेलदार, रवींद्र गांगुर्डे आणि सागर रावते यांनी सहकार्य केले.
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.