धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H33095
धुळे : विभागीय आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत यशप्राप्त एसव्हीकेएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह मान्यवर.
---
‘एसव्हीकेएम’च्या संघांची चमकदार कामगिरी
---
विभागीय आंतरमहाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेत यश
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (लोणेरे) अंतर्गत आयोजित जळगाव विभागीय आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेत धुळ्यातील एसव्हीकेएम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुलांची संघ विजयी झाला. तर मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला.
धुळ्यातील एसव्हीकेएम एनएमआयएमएस ग्लोबल युनिव्हर्सिटी येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांतील पुरुष व महिला गटांमधील एकूण १७ संघांनी सहभाग नोंदविला. प्राचार्य डॉ. निलेश साळुंके यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. या स्पर्धेत एसव्हीकेएम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकाविले. तर मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला. मुलांच्या विजयी संघात दर्शन जाधव (अंतिम वर्ष, कॉम्प्युटर), यश चौधरी (तृतीय वर्ष, कॉम्प्युटर), नीरज गवळे (तृतीय वर्ष, इलेक्ट्रिकल) आणि विशाल शर्मा (तृतीय वर्ष, सिव्हील) यांचा सहभाग होता. मुलींच्या संघात वैष्णवी कासार (तृतीय वर्ष, आयटी), मयूरी चव्हाण (अंतिम वर्ष, कॉम्प्युटर), मित्तल सिसोदे (अंतिम वर्ष, कॉम्प्युटर) आणि जुही कुर्सिजा (तृतीय वर्ष, कॉम्प्युटर) यांचा सहभाग होता. या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत यश प्राप्त केले. या यशाबद्दल एसव्हीकेएम संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, एसव्हीकेएम एनएमआयएमएस ग्लोबल युनिव्हर्सिटी प्रेसिडेंट व चान्सलर स्नेहा अंकित पारिख, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, धुळे कॅम्पस चेअरमन संजय अग्रवाल, मार्गदर्शक डॉ. अजय पसारी, कुलगुरू डॉ. अंकुर कुलकर्णी, प्राचार्य डॉ. साळुंके यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक केले. प्राचार्य डॉ. साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक मनोज सोनार, प्रा. सागर देशमुख, आयोजन समिती आणि सहभागी महाविद्यालयांच्या क्रीडा संचालकांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.