धुळे टुडे २ साठी...
---
फोटो- NSK26H32059
नाशिक ः रेवे फार्मा कंपनीला भेटीप्रसंगी धुळ्यातील एसव्हीकेएमच्या स्कूल ऑफ फार्मसी ॲन्ड टेक्नॉलॉजीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी.
---
‘एसव्हीकेएम’च्या विद्यार्थ्यांची उद्योगांना भेट
नाशिक येथील दोन कंपन्यांना भेट; उत्पादननिर्मितीची घेतली माहिती
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १२ ः एसव्हीकेएमच्या एनएमआयएमएस ग्लोबल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसी ॲन्ड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटच्या बीटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी अलीकडेच नाशिक येथील इन्स्टो कॉस्मेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि रेवे फार्मा या अग्रगण्य उद्योगांना औद्योगिक भेट दिली. याद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक सौंदर्यप्रसाधननिर्मिती तंत्रज्ञान, उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, संशोधन व विकास, तसेच औद्योगिक व्यवस्थापनाचा अनुभव घेता आला.
कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना वर्गातील सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष औद्योगिक वातावरणाची ओळख करून देणे, हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.
नाशिकच्या इन्स्टो कॉस्मेटिक्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये विद्यार्थ्यांनी सौंदर्यप्रसाधने, त्वचा व केस निगा उत्पादने, शाम्पू आणि औषधी क्रीम्सच्या निर्मिती प्रक्रियेची सविस्तर माहिती घेतली. कच्च्या मालाचा वापर, तापमान व गती नियंत्रण, तसेच पॅकेजिंग आणि गुणवत्ता नियंत्रणाच्या विविध टप्प्यांचा अभ्यास त्यांनी केला. या कंपनीकडे संशोधन व विकासासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा असून, ती खासगी लेबल आणि कराराधारित उत्पादन निर्मिती करते. रेवे फार्मा या दुसऱ्या उत्पादन केंद्रात विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक, हर्बल व नैसर्गिक घटकांवर आधारित कॉस्मेटिक आणि वैयक्तिक निगा उत्पादनांच्या निर्मितीची प्रक्रिया समजली. नवीन उत्पादनांची निर्मिती, वातानुकूलित सूत्रीकरण, नियामक बाबी आणि व्यावसायिक उत्पादनाचे टप्पे याविषयी येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. आयुर्वेदिक संकल्पना आणि आधुनिक वैज्ञानिक संशोधनाचा समन्वय कसा साधला जातो, याचे उत्तम उदाहरण विद्यार्थ्यांना पाहायला मिळाले.
विद्यार्थ्यांसाठी उपक्रम उपयोगी
या भेटीबाबत एसपीटीएमचे प्राचार्य डॉ. समीर गोयल यांनी अशा औद्योगिक भेटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता, तांत्रिक दृष्टिकोन आणि उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित होतात, जी भविष्यात त्यांना संशोधनापासून उद्योजकतेपर्यंतच्या क्षेत्रात अत्यंत उपयोगी ठरतील असे सांगितले. या औद्योगिक भेटीचे नियोजन प्रा. डॉ. आरती बेलमगवार, प्रा. पूर्वज बारोटे, प्रा. गौरव चव्हाण, प्रा. प्रांजल गुजराथी यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.