Swami Samarth Kendra Extortion case suspect sarika sonavane esakal
नाशिक

Swami Samarth Kendra Extortion case: खंडणीप्रकरणी संशयित महिला कृषी अधिकाऱ्याच्या भावाला अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Extortion Crime : दिडोरी प्रणित स्वामी समर्थ गुरुपीठाचे विश्वस्तास आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एक कोटी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या संशयित महिला कृषी अधिकाऱ्याच्या भावाला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे.

संशयित महिला अधिकारी सारीका सोनवणे हिचे देवळा येथील माहेर असून तेथून पोलिसांनी १९ लाखांची रोकड जप्त केली आहे.

याप्रकरणात तिचा भाऊ विनाेद सयाजी चव्हाण (४१, रा. देवळा) याच अटक करून त्याच्याकडे आणखी रोकड असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. त्यास न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. (Swami Samarth Kendra Extortion case Suspected woman agriculture officer sarika sonavane brother arrested nashik crime)

स्वामी समर्थ सेवा केंद्राचे विश्वस्त निंबा मोतीराम शिरसाठ (रा. गंगापूर रोड) यांना धमकावून संशयित महिला कृषी अधिकारी सारिका बापूराव सोनवणे (४२) व तिचा मुलगा मोहित सोनवणे (२५, रा. सिडको) यांना १० लाखांची खंडणी घेताना गंगापूर व खंडणी विरोधी पोलीस पथकाने गेल्या शनिवारी (ता.१८) अटक केली होती.

याच प्रकरणाच्या तपासातून पोलिसांनी संशयित सारिका सोनवणे हिचा भाऊ विनोद सयाजी चव्हाण यास देवळ्यात सोमवारी (ता.२०) मध्यरात्री अटक केली. संशयित सोनवणे हिचे माहेर असलेल्या देवळ्यातील घरातून पोलिसांनी १९ लाखांची रोकड जप्त केली आहे.

तसेच, खंडणीच्या रकमेतून काही रक्कम सारिक सोनवणे हिने भाऊ चव्हाण याच्याकडे दिली असल्याचे पोलिस तपासातून समोर आलेले आहे. तसेच, तो खंडणीच्या प्रकरणातही सामील होता असेही तपासातून निष्पन्न झाले आहे.

त्यामुळेच त्यास पोलिसांनी अटक केली आहे. त्यास मंगळवारी (ता.२१) न्यायालयात हजर केले असता, त्यास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

निलंबित होणार

खंडणी प्रकरणातील मुख्य संशयित सारिका सोनवणे या निफाड येथे कृषी सहायक अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. तर गेल्या ४ ऑक्टोबरपासून त्या वैद्यकीय रजेवर होत्या.

दरम्यान, खंडणीप्रकरणी गेल्या शनिवारी (ता.१८) त्यांना अटक झाली असून, गेल्या चार दिवसांपासून त्या पोलीस कोठडीत आहेत. कृषी विभागास पोलिसांचा अहवाल प्राप्त होताच, सारिक सोनवणे यांना निलंबित करण्यात येणार असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी संजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

व्हिडिओची प्रतिक्षाच

खंडणी प्रकरणात जो आक्षेपार्ह व्हिडिओ सांगितला जातो, त्याच्या सत्यतेसाठी तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आलेला आहे. त्याबाबत अद्याप कोणताही अहवाल पोलिसांना प्राप्त झालेला नसून पोलीस त्या अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत.

तर दुसरीकडे संशयित सारिका सोनवणे, मोहित सोनवणे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना बुधवारी (ता.२२) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT