नाशिक

रणजी चषक स्पर्धेसाठी तनय महाराष्ट्र संघात

CD
32187 रणजी चषक स्पर्धेसाठी तनय संघवी महाराष्ट्र संघात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ः रणजी चषक स्‍पर्धेसाठी नाशिकचा अष्टपैलू खेळाडू तनय संघवी याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. जलदगती तनय संघवीने मागील हंगामात झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या एमपीएलमध्ये प्रभावी कामगिरी केली होती. एमपीएलमध्ये तनयने ११ सामन्यात सर्वाधिक २० बळी घेत उत्कृष्ठ गोलंदाज सन्मान (पर्पल कॅप) मिळविला होता. या कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघातर्फे सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी तनयची निवड झाली होती. गेल्‍या वर्षी ४ डिसेंबरला त्याने मध्यप्रदेश विरुद्ध पदार्पण केले. त्यानंतर उत्तर प्रदेश व गोवा विरुद्ध सामन्यातही तो खेळला. त्यात त्याने गोलंदाजीत मध्यप्रदेश विरुद्ध १, उत्तर प्रदेश विरुद्ध २ तर गोवा संघाचे ३ गडी बाद करून छान चमक दाखवली. सुरुवातीपासून नाशिकमध्ये क्रिकेटचे धडे गिरवलेला जलदगती गोलंदाज व अतिशय उपयुक्त मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज असलेला अष्टपैलु तनय संघवी गेली काही वर्षे पुण्यात खेळत आहे. यंदा त्याचा चार दिवसीय स्वरूपातील रणजी ट्रॉफी स्पर्धेसाठी विचार झाला आहे. नाशिकचा हा २६ वर्षीय अष्टपैलु तनय संघवी, पृथ्वी शॉ किंवा ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात अंतिम ११ खेळाडूंच्या संघात स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. या स्‍पर्धेतील पहिल्‍या टप्‍यात महाराष्ट्राची लढत १८ ऑक्‍टोबरला झारखंडसोबत तर २६ ऑक्‍टोबरला गुजराथ, २ नोव्‍हेंबरला बंगाल संघासोबत होणार आहे. तनयच्या निवडीचे स्‍वागत व अभिनंदन क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Rally: शेअर बाजारात तुफान तेजी! गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स १,१०९ अंकांनी वधारला

Pregnant journalist allegation: गर्भवती महिला पत्रकाराला राहुल गांधींनी धक्का दिल्याचा आरोप; 'एक्स-रे'वरून काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न

Latest Marathi News Live Update: गोडाऊनसमोर लावलेली दुचाकी चोरीला

जैन आहे 'सनई चौघडे' मधील अभिनेत्री; घरी नवरात्री कशी साजरी होते हे सांगताना म्हणाली- आम्ही नऊ दिवस...

WTC Points Table: ऑस्ट्रेलियाच्या विजयाने भारताच्या WTC Final खेळण्याच्या स्वप्नाचा चुराडा? जाणून घ्या समीकरण

SCROLL FOR NEXT