NMC esakal
नाशिक

टेक्नोसेव्ही वास्तुविशारद झळकणार मनपाच्या संकेतस्थळावर

विक्रांत मते

नाशिक : १ जुलैपासून बांधकाम परवानगी ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही वास्तुविशारदांकडून तांत्रिक अडचणी पुढे करण्याबरोबरच बांधकाम व्यावसायिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा चुकीच्या पद्धतीने निर्माण होत असलेल्या प्रपोगंडाला दूर सारण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अधिकाधिक प्रकरणे मंजूर करणाऱ्या पहिल्या दहा वास्तुविशारदांची नावे महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करून प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात बांधकाम परवान्यांसाठी एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर करण्यात आली आहे. नियमावलीनुसार ऑनलाइन परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी विलंब लागणार असल्याने ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑफलाइन परवानगीची मुभा देण्यात आली होती. टप्पाटटप्प्याने परवानगीस मुदतवाढ देण्यात आली. ३० जूनला अखेरची मुदत देण्यात आल्यानंतर १ जुलैपासून ऑनलाइन परवानगी सुरू झाली. ऑफलाइन परवानगीमध्ये मागील तारखा टाकून प्रकरणे मंजूर करण्याची संधी असल्याने आजही अनेक वास्तुविशारदांचा आग्रह ऑफलाइनच आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रपोगंडा करण्यात आला असून, बांधकाम व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे ऑनलाइन परवानगीलाच चालना मिळण्याच्या उद्देशाने या पद्धतीने अधिकाधिक परवानगी घेणाऱ्या पहिल्या दहा वास्तुविशारदांची नावे मनपाच्या संकेतस्थळावर झळकविले जाणार आहे. जेणेकरून त्या वास्तुविशारदांचा आदर्श घेऊन त्यांच्यामार्फतच किंवा ऑनलाइन पद्धतीला चालना मिळेल, असा विश्‍वास या निर्णयामागे आहे.

"ऑनलाइन बांधकाम पद्धतीला चालना मिळाल्यास अचूक व कमी वेळात बांधकाम परवानगीची प्रकरणे मार्गी लागतील. ऑनलाइन पद्धतीने अधिक प्रकरणे मंजूर करणाऱ्या वास्तुविशारदांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे."

- रमेश पवार, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT