प्रात्यक्षिकांनी डोळ्यांचे पारणे फेडले sakal
नाशिक

नाशिक : प्रात्यक्षिकांनी डोळ्यांचे पारणे फेडले

कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल दीक्षान्त सोहळा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट्स)मधून कॉम्बॅट आर्मी एव्हिएटर्सचे प्रगत प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या ३६ व्या तुकडीचा दीक्षान्त समारंभ शुक्रवारी सकाळी उत्साहात पार पडला. या वेळी शिमला येथील आर्मी ट्रेनिंग कमांड केंद्राचे कमांडर लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांच्या हस्ते यशस्वी प्रशिक्षणार्थींचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.

या वेळी स्कूल ऑफ आर्टिलरीचे लेफ्टनंट जनरल आर. के. शर्मा यांच्यासह कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलचे कमांडर ब्रिगेडिअर संजय वढेरा, कर्नल अक्षय कपूर, कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलचे डेप्युटी कमांडर आणि मुख्य प्रशिक्षक कर्नल तुषार कुमार आदींसह इतर अधिकारी, प्रशिक्षणार्थींचे कुटुंबीय उपस्थित होते.

पासिंग आउट परेडनंतर जवानांनी हेलिकॉप्टर्सच्या विविध हवाई कसरतींचे सादरीकरण करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३६ व्या तुकडीतील सर्व ३० पायलटचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीची पी. के. गौर ट्रॉफी, एअर ऑब्झर्व्हेशन पोस्ट- ३६- ट्रॉफी आणि एकूण गुणवत्तेत प्रथम येणाऱ्यास दिल्या जाणाऱ्या सिल्व्हर चिता ट्रॉफीचे मानकरी कॅप्टन वैभव ठरले. कॅप्टन मोहित राज यांना उड्डाण कौशल्यासाठी एकूण गुणवत्तेत प्रथम आल्याबद्दल कॅप्टन एस. के. शर्मा ट्रॉफी मिळाली.

कमांडर लेफ्टनंट जनरल राज शुक्ला म्हणाले, की या प्रशिक्षणातून प्राप्त कौशल्यांचा देशापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी पूर्ण क्षमतेने वापर करा. भारतीय सैन्य दलात सर्वांत वेगाने प्रगती करणारी कॅट्स हीदेखील एक प्रशिक्षण संस्था आहे. कॅट्सचा १३ वर्षांचा वैभवशाली इतिहास असून, अशा वैभवशाली केंद्राचा आपण अविभाज्य घटक असून, खात्री आहे की आपण आपल्या कौशल्याच्याअधारे आणि उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर स्वत:ला उत्कृष्ट असे लढाऊ वैमानिक म्हणून सिद्ध कराल. कौशल्य आणि समर्पणाच्या जोरावर देशापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी तत्पर राहा.

आजवर कॉम्बॅट आर्मी एव्हिएटर्सने देशाच्या सीमांवर महत्त्वाची भूमिका निभावली आहे. आता आव्हानांचे स्वरूप बदलले आहे. या आव्हानांचा सामना करण्याची अद्वितीय जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. या प्रशिक्षणातून विकसित कौशल्य आणि क्षमतांचा सर्वोच्च वापर करून भविष्यातील आव्हानांचा सामना करून स्वतःला सिद्ध करा, असे आवाहन लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांनी या वेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'दुपारी १.११ वाजता बॉम्बस्फोट'... विधानभवनाला धमकीचा ई-मेल, सुरक्षा यंत्रणांची धावपळ

Ben Stokes Retirement Reason: ऑस्ट्रेलियात नेमकं काय घडलं? बेन स्टोक्सने निवृत्तीचं खरं कारण सांगितलं म्हणाला माझ्यात आता...

Nagpur Crime: प्रेयसीने बोलणे बंद केलं, प्रियकराने रचला कट; नागपुरात धक्कादायक प्रकार, एमडीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न अन्..

Latest Marathi News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, कार अन् पिकअपची धडक

Alandi Property Tax: आळंदीतील चतुर्थ वार्षिक करवाढीवर 748 हरकती; उद्या नगरपरिषदेत दिवसभर सुनावणी

SCROLL FOR NEXT