नाशिक

जिल्‍हा मुख्याध्यापक संघाचा २८ जूनपासून उपोषणाचा इशारा

अरूण मलाणी

शिक्षकांची प्रश्न मार्गी लागत नसल्‍याने शिक्षकांच्‍या वेतनाचा खेळखंडोबा झाला आहे.

नाशिक : शिक्षकांच्या विविध तक्रारी अडचणी व मागण्यासंदर्भात गेल्या महिनाभरापासून शिक्षण उपसंचालक वेतन पथक कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्यासमोर विविध आंदोलने झाले. तरीही शिक्षकांची प्रश्न मार्गी लागत नसल्‍याने शिक्षकांच्‍या वेतनाचा खेळखंडोबा झाला आहे. या प्रश्‍नी जिल्‍हा मुख्याध्यापक संघातर्फे येत्‍या २८ जूनपासून शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. (The district headmasters union has warned of a hunger strike in front of the education officers office from June 28)

मुख्याध्यापक संघातर्फे जारी प्रसिद्धीपत्रकात म्‍हटले आहे, की गेल्या मार्चपासून जिल्ह्यातील शिक्षकांच्या वेतनाचा खेळखंडोबा झालेला आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालय वेतन पथक कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्यात विविध प्रकारची आंदोलने केले. शिक्षणाधिकारी त्यांच्या कार्यालयात थांबत नाही, सह्या करत नाहीत, वर्षानुवर्षे पदोन्नतीचे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीची प्रकरणे प्रलंबित आहेत. गेल्या अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांना फंडाच्या स्लिप मिळालेल्या नाहीत. डीसीपीएस एनपीएस धारकांचा हिशेब मिळालेला नाही. मेडिकल बिले व पुरवणी बिल यांचाही असाच अनेक वर्षांचा गोंधळ सुरू आहे.

सर्व बाबी सहन करण्यापलीकडे झाली असल्‍याचे सांगत नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे २८ जूनपासून शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यालयीन अधीक्षक सुधीर पगार यांना दिला आहे. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव भामरे, कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, कार्यवाह आर डी निकम, नीलेश ठाकूर, जयेश सावंत, त्र्यंबक मार्तंड, राजेंद्र शेळके, मधुकर भांडारकर आदी उपस्थित होते. (The district headmasters' union has warned of a hunger strike in front of the education officers office from June 28)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT